जिल्ह्यातील १२४ चारा छावण्यांत ७२ हजारांवर जनावरे

जिल्ह्यातील १२४ चारा छावण्यांत ७२ हजारांवर जनावरे
जिल्ह्यातील १२४ चारा छावण्यांत ७२ हजारांवर जनावरे

सातारा ः जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पावसामुळे शेतातील बहुतांशी कामे ठप्प झाली असताना पावसाअभावी पूर्वेकडील दुष्काळी तालुके कोरडे असल्याने छावण्यांबरोबर जनावरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ सुरू आहे. जिल्ह्यात शासनाकडून १२४ चारा छावण्या सुरू असून यामध्ये ७२ हजार ६६९ लहान-मोठी जनावरांची उपजीविका सुरू आहे. 

जिल्ह्यात दोन्ही टोकात मोठी तफावत झाली असल्याचे दिसू लागले आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील महाबळेश्वर, जावली, पाटण, सातारा, कऱ्हाड या तालुक्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतात पाणी साचल्याबरोबर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. या पावसामुळे शेतकरी कामे ठप्प झाली आहे. याउलट जिल्ह्याच्या पूर्व भागात परिस्थिती निर्माण झाली आहे.

पावसाचे दमदार आगमन न झाल्याने पाण्याअभावी सर्व कामे ठप्प झाली आहेत. चारा व पाण्यावाचून जनावरांची उपासमार होऊ नये यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. यामुळे इतर सर्व कामे सोडून त्याच्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे, अशा जनावरांसाठी छावणीत आश्रय घेऊन राहात आहेत. राज्यशासनाने सुरू केलेल्या छावण्यात दिवसेंदिवस शेतकऱ्यांची वाढू लागली आहे. 

जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण या तीन तालुक्यांत १२४ चारा छावण्या सुरू असून यामध्ये ९५७७ लहान, ६३,०९२ मोठी अशी एकूण ७२ हजार ६६९ जनावरांचा समावेश आहे. माण तालुक्यात सर्वाधिक लहान व मोठी अशी ५८,८११ जनावरे आहेत. त्यानंतर खटाव तालुक्यात २१ चारा छावणीत ११४७ लहान तर ६७१९ मोठी तर फलटण तालुक्यात १२ चारा छावण्यांत ७७४ लहान व ५२१९ मोठी अशी एकूण २५१९ जनावरे छावणीत उपस्थिती आहे. 

शेळ्या-मेंढ्याची पहिली छावणी माण तालुक्यात  शेळ्या-मेढ्यांसाठी राज्यशासनाने राज्यातील पहिली चारा छावणी पिंगळी ब्रु येथे सुरू केली आहे. सध्या जिल्ह्यात शेळ्या-मेंढ्यासाठी तीन छावण्या मंजूर असून यामध्ये दोन चारा छावण्या सुरू आहेत. या दोन चारा छावणीत ७९१ शेळ्या, ३६४ मेंढ्या असे एकूण ११५५ शेळ्या-मेंढ्या दाखल झाल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com