देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार

देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार

नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण सात हजार ९२८ उमेदवारांमध्ये ७२४ महिला होत्या. गुरुवारी (ता. २३) मतमोजणीनंतर विजय व पराभवाचा काटा कोणाकडे सरकणार, त्याबद्दल उत्सुकता आहे. कॉंग्रेस पक्षाने सर्वाधिक ५४ महिलांना यंदा उमेदवारी दिली. त्याखालोखाल सत्ताधारी भाजपकडून ५३ महिलांनी निवडणूक लढविली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने केवळ एकच महिलेला उमेदवारी दिली आहे. महिला उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या माहितीचे विश्‍लेषण "असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म'ने (एडीआर) केले आहे. त्यातून ही माहिती समोर आली. राजकीय पक्षांपेक्षा अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या महिला उमेदवारांचे द्विशतक झाले असून, त्यांची संख्या तब्बल २२२ आहे. केवळ आम आदमी पक्षानेच तृतीयपंथीयाला उमेदवारी दिली आहे. सर्वांत श्रीमंत उमेदवार भाजपच्या हेमामालिनी ठरल्या आहेत. त्यांच्या नावावर २५० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. २१ व्या शतकातही महिला शिक्षणापासून दूर असल्याचे "एडीआर'च्या अहवालातून दिसले आहे. निवडणूक आखाड्यातील २६ महिला उमेदवार निरक्षर आहेत. महिला उमेदवारांची संक्षिप्त माहिती... पक्षनिहाय महिला उमेदवार कॉंग्रेस : ५४ भाजप : ५३ बसप : २४ तृणमूल कॉंग्रेस : २३ माकप : १० भाकप : ४ राष्ट्रवादी कॉंग्रेस : १ आप : १ अपक्ष : २२२

आरोपी उमेदवार गुन्हेगारी पार्श्‍वभूमी : १०० गंभीर स्वरूपाचे गुन्हे : ७८ दोषी ठरलेल्या : २ खुनाचे आरोप : ४ खुनाचा प्रयत्न : १६ भ्रूणहत्या : १४ प्रक्षोभक भाषण : ७ गुन्हेगारी पार्श्‍वभूमी भाजप : १३ कॉंग्रेस : १० करोडपती उमेदवार २०१९मधील संख्या : २५५ २०१४मधील संख्या : २१९ पक्षनिहाय मालमत्ता सप : ३९.८५ कोटी भाजप : २२.०९ कोटी कॉंग्रेस : १८.८४ कोटी बसप : ३.०३ कोटी आप : २.९२ कोटी अपक्ष उमेदवार : १.६३ कोटी तृणमूल कॉंग्रेस : २.६७ कोटी माकप : १.३३ कोटी श्रीमंत उमेदवार (कोटी रु.) हेमामालिनी (भाजप) : २५० डीए सत्यप्रभा (तेलुगू देशम पक्ष) : २२० हरसिमरतकौर बादल (शिरोमणी अकाली दल) : २१७ काहीही नाही : ६ शैक्षणिक पार्श्‍वभूमी निरक्षर : २६ नवसाक्षर : ३६ विविध वयोगट २५ ते ५० वर्षे : ५३१ ५१ ते ८०वर्षे : १८० ८० वर्षांहून जास्त : १ २५ वर्षांपेक्षा कमी : १

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com