agriculture news in marathi, 73 lakh income to temple committee | Agrowon

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री वारीत ७६ लाखांचे उत्पन्न
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री वारीमध्ये पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला ७५ लाख ९५ हजार ९५८ रुपये इतके उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या यात्रेतील उत्पन्नाच्या तुलनेत मंदिर समितीला या वर्षी तीन लाख ९६ हजार २६८ रुपये इतके जादा उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली. 

सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री वारीमध्ये पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला ७५ लाख ९५ हजार ९५८ रुपये इतके उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या यात्रेतील उत्पन्नाच्या तुलनेत मंदिर समितीला या वर्षी तीन लाख ९६ हजार २६८ रुपये इतके जादा उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली. 

याबाबत माहिती देताना कार्यकारी अधिकारी ढोले म्हणाले, श्री विठुरायाच्या पायावर १४ लाख ५ हजार ३०९ तर रुक्मिणीमातेच्या पायावर ३ लाख ६६ हजार ९१३ रुपये प्राप्त झाले. याशिवाय अन्नछत्र देणगी दोन लाख २७ हजार ४७, पावती स्वरूपातील देणगी १९ लाख ९३ हजार ३४२ रुपये, बुंदी लाडू प्रसाद विक्रीद्वारे १६ लाख ७१ हजार आणि राजगिरा लाडू विक्रीतून एक लाख ६ हजार ५००, फोटो विक्री २७ हजार ५७५ रुपये, मंदिर समितीच्या विविध भक्तनिवासद्वारे ४ लाख ४९ हजार ११०, नित्यपूजा दोन लाख ६१ हजार, श्री विठ्ठल विधी उपचार ९२ हजार, आॅनलाइन देणगीद्वारे दोन लाख ८३ हजार ३५५ रुपये, चंदनउटी पूजेद्वारे तीन लाख ५ हजार आणि इतर अन्य स्वरूपात चार लाख ७ हजार ८१७ रुपये इतक्या रकमेचा समावेश होतो. 

या वर्षी चैत्री वारीच्या काळात सुमारे ५ लाख ३३ हजार ९५२ भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाचा लाभ घेतल्याचीही माहितीही त्यांनी दिली.

इतर बातम्या
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
पावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...