Agriculture News in Marathi 74% in bulldozers Farmers get peak loans | Agrowon

बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले पीककर्ज 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 सप्टेंबर 2021

यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित केलेल्या १३०० कोटींच्या पीककर्ज रकमेपैकी ९६८ कोटींचे वितरण झाल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेकडून मिळाली आहे.

बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित केलेल्या १३०० कोटींच्या पीककर्ज रकमेपैकी ९६८ कोटींचे वितरण झाल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेकडून मिळाली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत खरीप पीककर्ज वाटपाची अंतिम मुदत असून, या काळात आणखी पीककर्ज वाटपाचा टक्का वाढणार आहे. शेतकऱ्यांनी हंगामात पीक लागवडीसह इतर शेतीविषयक कामांसाठी पीककर्ज अत्यंत महत्त्वाचे राहते. यासाठी दर वर्षी शासनाकडून हंगामासाठी नियोजन करीत १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या काळात खरीप पीककर्जाचे वितरण केले जाते. 

शासनाने मागील हंगामात थकीत कर्ज माफ केल्याने अनेकांना नव्‍याने पीककर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. थकीत कर्जाचे पुनर्गठन, तसेच नूतनीकरण न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना अद्याप पीककर्ज मिळाले नसल्याची वस्तुस्थितीसुद्धा आहे. जिल्ह्यात १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १३०० कोटींचे पीककर्ज वाटपाचा लक्ष्यांक या हंगामासाठी घेण्यात आलेला आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे ९९ हजारांवर शेतकऱ्यांना ९६८ कोटींचे कर्ज वितरीत झाले आहे.

अद्यापही २६ टक्के शेतकरी पीककर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. पात्र असलेल्या या शेतकऱ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत खरीप पीककर्ज देण्याची मुदत आहे. गेल्या हंगामात १२६५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप झाले होते. यंदा हा आकडा बँका गाठू शकतील काय, हे ३० सप्टेंबरनंतरच स्पष्ट होणार आहे. 

‘त्या’ शेतकऱ्यांचे काय 
दोन लाखांवर पीककर्ज असलेल्यांना शासनाने जी मदत करण्याची घोषणा केली होती, त्याचा लाभ अद्यापही अनेकांना मिळालेला नाही. मोठे क्षेत्र असलेल्यांचीही हीच गत आहे. शिवाय नियमित कर्जभरणा करणाऱ्यांचाही विचार झालेला नाही. आम्हाला कर्जमाफी योजनेचा कधी लाभ मिळेल, असा प्रश्‍न शेतकरी सातत्याने बँकांकडे विचारत असतात. 

रब्बीसाठी २५० कोटींचे नियोजन 
पीककर्ज वितरणाचा एक ऑक्टोबरपासून रब्बी हंगाम सुरू होत आहे. यंदा या हंगामासाठी २५० कोटींचा लक्ष्यांक ठेवण्यात आलेला आहे. यंदा पावसाची स्थिती चांगली असल्याने रब्बी लागवडीकडे कल राहणार आहे. या पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. या शेतकऱ्यांना १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या काळात रब्बी पीक कर्जवाटप केले जाणार आहे. 

प्रतिक्रीया... 
पीक कर्जवाटपासाठी बँकांचे काम सुरू आहे. बँकांकडे सादर असलेले प्रस्ताव २८ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे काम केले जात आहे. कोणीही पात्र शेतकरी पीककर्ज वाटपातून सुटणार नाही. 
-नरेश हेडाऊ, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅँक, बुलडाणा  


इतर बातम्या
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त,...
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू...पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून...पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी  नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६...
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच...अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोधधुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ...बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस,...
`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी...हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान...
नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात...नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१...
यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ...आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची...