परभणी जिल्ह्यात ७४.४३ टक्के पेरणी

परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवार (ता. ३) पर्यंत ३ लाख ८४ हजार ८८६ हेक्टरवर (७४.४३ टक्के) पेरणी झाली. या बाबत कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली.
74.43 percent sowing in Parbhani district
74.43 percent sowing in Parbhani district

परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवार (ता. ३) पर्यंत ३ लाख ८४ हजार ८८६ हेक्टरवर (७४.४३ टक्के) पेरणी झाली. या बाबत कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली.

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ५ लाख १७ हजार १४२ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. अनेक मंडळांत अपुऱ्या पावसामुळे पेरण्यांना उशीर झाला. शुक्रवार (ता.३) पर्यंत जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांत ३ लाख ८४ हजार ८८६ हेक्टरवर पेरणी झाली. ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ९ हजार ९५८ हेक्टर, तर पेरणी ३ हजार ८१२ हेक्टरवर (३८.२८ टक्के), बाजरीचे सर्वसाधारण क्षेत्र १ हजार ७०० हेक्टर, तर २४९ हेक्टरवर (१४.६४ टक्के), मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ हजार २२३ हेक्टर, ६७१ हेक्टरवर (५४.८४ हेक्टर) पेरणी झाली.

तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ५० हजार ६०८ हेक्टर, तर पेरणी ३४ हजार ४९७ हेक्टरवर (६८.१६ टक्के), मुगाचे सर्वसाधारण क्षेत्र ३३ हजार ९९९ हेक्टर, तर पेरणी १७ हजार ३८७ हेक्टरवर (५१.१४ टक्के), उडदाचे सर्वसाधारण क्षेत्र ११ हजार ६७६ हेक्टर, तर पेरणी ५ हजार ७५२ हेक्टरवर (४९.२७ टक्के) झाली. तिळांचे सर्वसाधारण क्षेत्र ६८८ हेक्टर, तर पेरणी १२९ हेक्टरवर (१८.७४ टक्के), कारळाचे सर्वसाधारण क्षेत्र ३२२ हेक्टर, तर पेरणी ३१ हेक्टरवर (९.६१ टक्के), सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख १९ हजार २०२ हेक्टर, तर पेरणी १ लाख ७५ हजार ९५१ हेक्टरवर (८०.२७ टक्के) पेरणी झाली.

कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८५ हजार ७२० हेक्टर आहे. तर, १ लाख  ४६ हजार ४०७ हेक्टरवर (७८.८३ टक्के) लागवड झाली.

तृणधान्यांचे सर्वसाधारण क्षेत्र १४ हजार १५६ हेक्टर, तर पेरणी ४ हजार ७३२ हेक्टर (३३.४३ टक्के), कडधान्यांचे सर्वसाधारण क्षेत्र ९६ हजार ७१३ हेक्टर, तर पेरणी ५७ हजार ६३६ हेक्टरवर (५९.५९ टक्के), गळीत धान्यांचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख २० हजार ५५२ हेक्टर, तर पेरणी १ लाख ७६ हजार १११ हेक्टरवर (७९.८५ टक्के)  झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com