अकोला जिल्‍ह्यात नुकसानग्रस्तांना ७५ कोटींची प्रतीक्षा

अकोला जिल्‍ह्यात नुकसानग्रस्तांना ७५ कोटींची प्रतीक्षा
अकोला जिल्‍ह्यात नुकसानग्रस्तांना ७५ कोटींची प्रतीक्षा

अकोला  : शासनाने जाहीर केलेली नुकसानग्रस्तांची मदत संपूर्णपणे वितरित करण्यासाठी जिल्ह्याला आणखी ७५ कोटींच्या निधीची गरज आहे. या रकमेची शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना शासनाकडून आत्तापर्यंत दोन टप्प्यांत २३१ कोटी १० लाख ५८ हजार रुपये मिळालेले आहेत. संबंधित मदत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत वळतीही करण्यात  आली. 

गेल्या वर्षात ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील तीन लाख नऊ हजार ३४१ शेतकऱ्यांना यांचा फटका बसला  होता. तीन लाख ६९ हजार ७१९ हेक्टरवरील पिके या आपत्तीने बाधित झाली. या शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १६ नोव्हेंबर रोजी आर्थिक मदत जाहीर केली. त्यानुसार खरीप पिकांसाठी ८००० रुपये प्रति हेक्टरी आणि बारामाही पिकांसाठी १८ हजार रुपये मदत देण्यासंबंधी जाहीर झाले. 

अतिवृष्टीने बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३०६ कोटी २५ लाख ३९ हजार ९६० रुपयांच्या मदतीची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली  होती. या निधीपैकी ७२ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांचा पहिला व १५८ कोटी ५४ लाख ८१ हजार रुपयांचा दुसरा हप्ता जिल्हा प्रशासनाला मिळाला.

आता उर्वरित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ७५ कोटी रुपयांची गरज आहे. या वर्षातील आपत्तीत जिल्ह्यातील ३ लाख ६५ हजार ६९.४१ हेक्टरवरील जिरायती (काेरडवाहू) क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले. या क्षेत्रासाठी २९२ काेटी ५ लाख ५५ हजार २८० रुपयांची मदत अपेक्षित होती. 

बागायतदारांचे मोठे नुकसान

अतिवृष्टीमुळे २ हजार ४८२.२४ हेक्टरवरील बागायती पिकांचेही नुकसान झाले होते. यासाठी १ काेटी ९८ लाख ५७ हजार ९२० रुपये मदत हवी होती. तर फळबागांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर केल्यामुळे जिल्ह्यातील २३२ शेतकऱ्यांना ३ काेटी ९० लाख १६ हजार ८०० रुपयांची मदत आवश्‍यक होती. असे मिळून ३०५ कोटी २५ लाख रुपयांची एकूण गरज जिल्ह्याला होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com