कारंजालाड, जि.
बातम्या
सोलापूर जिल्ह्यातील ७५ ग्रामपंचायतींसाठीची रणधुमाळी
सोलापूर : बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी संपली असतानाच आता जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये मुदत संपणाऱ्या ७५ ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्यासाठी प्रभागरचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आयोगाच्या आदेशानुसार ९ ऑगस्टपर्यंत ७५ ग्रामपंचायतीची प्रभागरचना व आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. शनिवारी (७ जुलै) रोजी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली प्रारूप प्रभागरचनेवर आरक्षणाची सोडत काढणार आहेत. त्यानंतर १२ जुलै रोजी प्रारूप प्रभागरचना व आरक्षणास त्यांच्या समितीकडून मान्यता देण्यात येणार आहे.

प्रारूप प्रभागरचनेवर १३ ते २० जुलै या कालावधीत हरकती दाखल करणे, ३१ जुलैपर्यंत प्रांताधिकारी यांनी हरकतींवर सुनावणी घेणे व अंतिम निर्णयासह प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे, ६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांनी अंतिम मान्यता देणे व ९ ऑगस्ट रोजी अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करणे, असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीनंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार असल्याने कार्यकर्त्यांना उसंत मिळणार नाही. या निवडणुका स्थानिक प्रश्नावर आणि राजकारणावर चालत असल्याने त्यामध्ये अधिकच राजकारण रंगले जाते. दोन्ही बाजार समितीच्या राजकारणाचे पडसाद या निवडणुकीवर पडतील, अशी शक्यता आहे.
प्रारूप रचना होणाऱ्या तालुकानिहाय ग्रामपंचायती
तालुका - ग्रामपंचायती
करमाळा - लव्हे, वरकुटे, भाळवणी.
माढा - रोपळे क., पिंपळनेर, वेणेगाव, उजनी टें.
बार्शी - घारी, सुर्डी, लाडोळे, दहिटणे, रुई, ताडसौंदणे,
मोहोळ - वडदेगाव, गोटेवाडी, कोणेरी, लमाणतांडा,
पंढरपूर - बिटरगाव, जळोली, लोणारवाडी, पांढरेवाडी, गार्डी, जाधववाडी
माळशिरस - डोंबाळवाडी, झंझेवाडी, पिलीव, जाधववाडी, कदमवाडी, हनुमानवाडी, झंझेवस्ती, सुळेवाडी, भांबुर्डी
सांगोला - वाढेगाव, सोणंद, राजापूर, गळवेवाडी, बागलवाडी, सोनलवाडी,
मंगळवेढा - लक्ष्मीदहिवडी, लोणार, मानेवाडी, पडोळकरवाडी, डिकसळ, रेवेवाडी, देगाव, येळगी, खवे, कागस्ट, हुन्नूर, जित्ती, माळेवाडी, शिवणगी
दक्षिण सोलापूर - तिल्लेहाळ, औज-आहेरवाडी, उळेवाडी, उळे, आलेगाव, कुडल
अक्कलकोट - तळेवाड, कुडल, केगाव बु., बिंजगेर-हालहळ्ळी, केगाव खु., जकापूर, कलकर्जाळ, शावळ, कंटेहळ्ळी, धारसंग, म्हैसलगे, घुंगरेगाव, रामपूर, कल्लाप्पावाडी, संगोगी ब., सातनदुधनी, समर्थनगर.
- 1 of 915
- ››