agriculture news in Marathi 75 lac pockets of HTBT seed sold in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची विक्री 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 जून 2021

 बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील (एचटीबीटी) बियाण्यांचा फैलाव झालेला आहे. यंदा या बेकायदेशीर बियाण्यांची किमान ७५ लाख पाकिटे महाराष्ट्रात विकली गेली आहेत.

पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील (एचटीबीटी) बियाण्यांचा फैलाव झालेला आहे. यंदा या बेकायदेशीर बियाण्यांची किमान ७५ लाख पाकिटे महाराष्ट्रात विकली गेली आहेत, असा धक्कादायक अंदाज बियाणे उद्योगातून वर्तविण्यात आला आहे. 

फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्री ऑफ इंडिया (एफएसआयआय) व नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडियाने (एनएसएआय) या दोन्ही संस्थांनी ‘एचटीबीटी’ कपाशीच्या अवैध बियाणे लागवडीबाबत चिंता व्यक्त केली आहे. एचटीबीटीला नियंत्रणात आणण्यासाठी देशभर कृषी विभागातील अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, अवैध प्रसाराच्या कामांमध्ये सामील असलेल्या गैरप्रवृत्ती शोधाव्यात आणि कठोर कारवाई करावी, असे या संस्थांनी सुचविले आहे. 

जैव तंत्रज्ञानाच्या आधारे ‘एचटीबीटी’ बियाण्यांमधून बेकायदेशीरपणे काही बाबी वापरण्याचा प्रयत्न होतो आहे. ही बाब भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण करणारी ठरू शकते. याशिवाय या बियाण्यांची विक्री अवैधपणे होत असल्याने सरकारी महसूलदेखील बुडवला जात आहे, असाही मुद्दा फेडरेशनने मांडला आहे. 

अनेक राज्यांमध्ये बेकायदेशीरपणे ‘हर्बिसाईड टॉलरन्स ट्रान्सजेनिक कॉटन’च्या हायब्रीड बियाण्यांची लागवड झाल्याचे २०१७ मध्ये निदर्शनास आले होते. हा विषय लोकसभेत चर्चेला आला होता. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाद्वारे जैवतंत्रज्ञान विभागाच्या (डीबीटी) अंतर्गत क्षेत्र तपासणी आणि वैज्ञानिक मूल्यांकन समितीची (डीआयएसईसी) स्थापना केली गेली. ‘‘आनुवांशिकरीत्या सुधारित कपाशीची लागवड महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गुजरात राज्यात बेकायदेशीरपणे केली जात आहे,’’ असा निष्कर्ष या समितीने देखील काढला होता. 

यंदा दुप्पट बियाणे बाजारात 
या संस्थांनी थेट केंद्रीय कृषी मंत्रालय आणि अनुवांशिक अभियांत्रिकी मूल्यांकन समितीला (जीईएसी) पत्र लिहून काही मुद्दे लक्षात आणून दिले आहेत. ‘एफएसआयआय’चे अध्यक्ष डॉ. एम रामासामी म्हणाले, की अवैध असूनही ‘एचटीबीटी’ कापूस बियाण्यांच्या लागवड क्षेत्रात गेल्या काही वर्षांत वाढ होते आहे. आमच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात गेल्या हंगामात ‘एचटीबीटी’ची ३० लाख पाकिटे महाराष्ट्रात आली होती. मात्र चालू हंगामात ७५ लाख पाकिटे बाजारात विकली गेली आहेत. ‘एचटीबीटी’ बियाण्यांचा केवळ पर्यावरणालाच नव्हे; तर शेतकरी आणि बियाणे कंपन्यांना मोठा धोका आहे. 

प्रतिक्रिया 
एचटीबीटी बियाण्यांमुळे तंत्रज्ञान, पर्यावरण, शेतकरी आणि चांगल्या बियाणे कंपन्याही धोक्यात आल्या आहेत. अवैध बियाणे बाजारात येत राहिल्यास संशोधन व विकासावर चांगल्या कंपन्या गुंतवणूक करणार नाहीत. टंचाई असलेल्या सर्वच बियाण्यांच्या बाबत अवैध प्रकार आता वाढू लागले आहेत. 
- अजित मुळे, व्यवस्थापकीय संचालक, ग्रीनगोल्ड सीड्‌स 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
खानदेशात अतिपावसाने  कापूस पीकस्थिती...जळगाव : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकाची स्थिती...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
सौरकृषी पंपाच्या  कुसुम योजनेला अखेर...पुणे : उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे गेली...
पीक नुकसान तक्रारीसाठी धडपड औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
पंधरा हजार एकरवर बांबू लागवडनगर ः जगात सगळ्यात वेगाने वाढणाऱ्या परंतु...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
मराठवाड्यात २०० मेगावॉटचा सौर प्रकल्प ः...औरंगाबाद ः मराठवाड्यात येत्या वर्षात २००...
विदर्भ, मराठवाड्यात कमी पावसाचा अंदाजपुणे : कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र आणि...
महावितरणच्या वीजग्राहकांसाठी रूफटॉपमुंबई : महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील...
सोयापेंडेसाठी आयातदारांची अनेक देशांत...पुणे ः केंद्र सरकारने जनुकीय सुधारित...
फळगळ विषयक ‘त्या’ संदेशापासून राहा सावधनागपूर ः केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या...
प्रत्येक शाळेमध्ये उभारणार लोकसहभागातून...पुणे : वेगाने बदलत असलेल्या हवामानाची शाळेतील...
सेंद्रिय उत्पादनांचा ‘सात्त्विक कृषिधन...नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीप्रणीत शेतकरी उत्पादक...
आंबा, काजू, फणसापासून चॉकलेट मोदकांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोरे (वाडोस) येथील...
विमा कंपन्यांवर पूर्वसूचनांचा पाऊस !...पुणे : राज्याच्या विविध भागांत झालेल्या...
लाळ्या खुरकूत लसींची प्रतीक्षाच;...पुणे ः पावसाळा संपत आला तरी अद्याप राज्यातील दोन...
मॉन्सूनच्या परतीचा मुहूर्त लांबणारपुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून)...
राज्यात पावसाच्या उघडिपीची शक्यतापुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
श्रमदानातून ‘चुंब’ गाव झाले जल...स्वच्छता, रस्ते, भूमिगत गटार आदी विविध पायाभूत...