agriculture news in Marathi 7.5 lac pockets needed for Akola District Maharashtra | Agrowon

अकोला जिल्ह्यात बीटी कपाशीची हवेत साडेसात लाख पाकिटे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 एप्रिल 2020

सेंद्रीय बोंड अळीला रोखण्यासाठी पूर्व हंगामी पेरणी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या हंगामासाठी अकोला जिल्ह्याला किमान साडेसात लाख बीटी बियाण्याची पाकिटे लागणार आहेत. 

अकोला ः या खरीप हंगामासाठी शासनाने एक मे पासूनच बीटी कापूस बियाणे उपलब्ध करून देण्याचे आदेश कृषी आयुक्तालयाने दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून सेंद्रीय बोंड अळीला रोखण्यासाठी पूर्व हंगामी पेरणी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या हंगामासाठी अकोला जिल्ह्याला किमान साडेसात लाख बीटी बियाण्याची पाकिटे लागणार आहेत. 

मागील तीन-चार हंगामात सेंद्रीय बोंडअळीचा उद्रेक वाढल्याने उपाययोजना म्हणून पूर्व हंगामी पेरणी करण्यावर बंधन घालण्यात आले आहे. यामुळे दरवर्षी बीटी कपाशी  बियाण्याची विक्री २५ मे नंतर सुरु केली जात होती. सध्या कोरोनामुळे उदभवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना बियाणे मिळवताना अडचणी जाऊ नयेत, वितरण व्यवस्था सुरळीत व्हावी या उद्देशाने बियाणे विक्रीस एक मेपासूनच यंदा परवानगी देण्यात आली आहे.

आगामी खऱीप हंगामात जिल्हयात कपाशीचे सरासरी एक लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यंदा यासाठी बीटी कपाशीची सात लाख ५० हजार पाकिटे लागतील अशी शक्यता गृहीत धरत जिल्हा परिषद कृषी विभागाने मागणी नोंदविली आहे. बीटी बियाणे दरवर्षी नव्याने विकत घेऊन पेरले जाते. १०० टक्के बियाणे बदल होत असतो. यंदाच्या हंगामात १ लाख ५० हजार हेक्टरवर कपाशी लागवडीची शक्यता गृहीत धरून सात लाख ५० हजार पाकिटे लागतील, अशी शक्यता गृहीत धरण्यात आली. 
  


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...