Agriculture news in Marathi, 750 acres of the same village 7500 Kamphand Traps | Agrowon

एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध सापळे
संतोष मुंढे
शनिवार, 20 जुलै 2019

जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचं संकट संपलं असं नाही. पुन्हा ते संकट आलं तरी आम्ही सजग आहोत हे नजरेस आणून देताना जालना जिल्ह्यातील वानडगावातील ७५० एकर कपाशीच्या क्षेत्रावर तब्बल ७५०० कामगंध सापळे गुरुवारी (ता. १८) एकाच दिवशी लावले. त्यासाठी खरपुडी कृषी विज्ञान केंद्राने उत्कृष्ट कापूस सुधार प्रकल्पाच्या माध्यमातून पुढाकार घेतला. अशाप्रकारे एकाच गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक पद्‌धतीने कामगंध सापळे लावण्याचा हा एकमेव प्रयोग आहे. 

जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचं संकट संपलं असं नाही. पुन्हा ते संकट आलं तरी आम्ही सजग आहोत हे नजरेस आणून देताना जालना जिल्ह्यातील वानडगावातील ७५० एकर कपाशीच्या क्षेत्रावर तब्बल ७५०० कामगंध सापळे गुरुवारी (ता. १८) एकाच दिवशी लावले. त्यासाठी खरपुडी कृषी विज्ञान केंद्राने उत्कृष्ट कापूस सुधार प्रकल्पाच्या माध्यमातून पुढाकार घेतला. अशाप्रकारे एकाच गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक पद्‌धतीने कामगंध सापळे लावण्याचा हा एकमेव प्रयोग आहे. 

कपाशीवरील ज्या गुलाबी बोंड अळीनं कापूस उत्पादक व तज्ज्ञांची झोप उडविली होती. त्या अळीवर सामूहिक उपाययोजनांमधून गतवर्षी खरिपात नियंत्रण मिळविले होते. गत हंगामात खरपुडी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कडेगाव येथे गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ‘मास ट्रॅपिंग’चा प्रयोग राबविण्यात आला होता. त्या प्रयोगाच्या यशानंतर यंदा वानडगावात हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाची सुरवात करतेवेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कीटकशास्त्रज्ञ प्रा. अजय मिटकरी, सचिन गायकवाड, अधिकारी सुखदेवे, सरपंच शिवाजीराव नागवे, कृषी अधिकारी पवार यांची उपस्थिती होती. 

कापूस पिकाच्या उत्पादनात गुलाबी बोंड अळी ही प्रमुख समस्या आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल. उत्कृष्ट कापूस पुढाकार प्रकल्पांतर्गत केव्हीकेने सामूहिकरित्या राबविलेल्या अशा प्रयोगाची खरी गरज आहे. सोबतच शेतकऱ्यांनी गरज नसताना महागड्या कीटकनाशकाचा वापर करू नये.
- बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना

यंदा सुरवातीपासून गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी खबरदारी घेणे सुरू केले. पूर्वहंगामी लागवड न झाल्याने काही अशी नियंत्रण मिळाले, आता या मास ट्रॅपिंगमधून राहिलेले नियंत्रण मिळून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यास हातभार लागेल. 
- अजय मिटकरी, कीटकशास्त्रज्ञ, केव्हीके खरपुडी जि. जालना 

केव्हीकेच्या पुढाकाराने राबविलेल्या प्रकल्पांतर्गत माझ्या दहा एकर कपाशीच्या क्षेत्रात कामगंध सापळे लावले. याचा अळीचे नियंत्रणासाठी फायदाच होईल. त्याविषयी माहितीही तज्ज्ञांनी दिली. 
- रामदास सीताराम नागवेस, शेतकरी, वानडगाव ता. जि. जालना

इतर अॅग्रो विशेष
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...
विदर्भ, कोकणात पावसाची शक्यतापुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात...
पूरग्रस्त भागात जनावरांना न्यूमोनिया, ...पुणे : सततचा पाऊस आणि पुराच्या पाण्यात भिजल्याने...
पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील...मुंबई : पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर...
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...