agriculture news in Marathi 7500 crore stuck of sugar export subsidy Maharashtra | Agrowon

साखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार कोटी थकले 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 जून 2020

एकूण अनुदानाच्या तुलनेत तोकडी रक्‍कम कारखान्यांना मिळत आहे. ही बाब खरी आहे. आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. केंद्राकडून लवकरात लवकर अनुदान कारखान्यांना मिळावे यासाठी संपर्क सुरु आहे. या अधिवेशनात आमची मागणी मान्य होइल अशी अपेक्षा आहे. 
- प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवीन दिल्ली 

कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी केलेल्या साखर निर्यातीचे तब्बल साडेसात हजार कोटी रुपयांचे अनुदान केंद्राकडे प्रलंबित आहे. ८ हजार कोटींपैकी केवळ ७०० कोटी रुपये अनुदान अन्न मंत्रालयाकडे जमा झाले आहे. त्याचेही वाटप धीम्या गतीने सुरू आहे. केंद्राने अत्यंत तोकडी रक्कम कारखान्यांना दिल्याने साखर उद्योगात नाराजीचा सूर उमटत आहे. 

२०१८-१९ ला निर्यात झालेल्या साखरेचे २०० कोटी रुपयांचे अनुदान अन्न मंत्रालयाकडे आले आहे. २०१९-२० च्या अनुदानापोटी ५०० कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. म्हणजे गेल्या दोन वर्षांचे मिळून फक्त ७०० कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. एकूण साखर निर्यातीच्या तुलनेत ही रक्कम अत्यंत छोटी आहे. यामुळे या रकमेचा कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यावर फारसा फरक पडणार नसल्याचे कारखाने चिंतेत आहेत. केवळ महाराष्ट्रातील कारखान्यांचेच १२०० ते १३०० कोटी रुपयांचे अनुदान प्रलंबित आहे. 

मिळालेल्या सातशे कोटी रुपयापैकीही रक्कम देताना थोडी थोडी रक्‍कम दिली जात आहे. एकूण निर्यातीच्या दहा वीस टक्के रक्कमही कारखान्यांना मिळत नसल्याची स्थिती आहे. राखीव साठा अनुदान योजनेची काही रक्‍कम कारखान्यांना मिळत आहे. 

निर्यातीला गती पण अनुदानाचे भिजत घोंगडे 
गेल्या वर्षी साखर निर्यात उद्दिष्टापेक्षा खूपच कमी झाली होती. यामुळे केंद्राने यंदा विविध पातळ्यांवर जोर लावून कारखान्यांना साखर निर्यातीला प्रोत्साहन दिले. आंतरराष्ट्रीय पातळीवरही साखरेची चणचण असल्याने कारखान्यांनी निर्यातीला प्राधान्य दिले. यंदा साठ लाख टन उद्दिष्टांपैकी चाळीस लाख टन साखरेचे निर्यात करार झाले आहे. मध्यंतरीच्या लॉकडाउनच्या अडथळ्यानंतर आता निर्यात सुरळीत होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर निर्यात समाधानकारक होइल असे चित्र आहे पण निर्यात अनुदान मिळत नसल्याने सगळ्याच प्रयत्नावर पाणी फेरण्याची चिन्हे असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे. 

ऑगस्टनंतर आशा? 
कोविडमुळे संसदेचे अधिवेशन वेळेत झालेले नाही. हे अधिवेशन जुलैमध्ये झाल्यास ८००० कोटी रुपयांची पुरवणी मागणी मांडून ती मंजूर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. जुलैमध्ये ही मागणी मंजूर झाल्यास ऑगस्टपासून अनुदान मिळण्याची शक्‍यता आहे, असे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. 


इतर अॅग्रोमनी
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...
हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
ब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...
साखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...
पुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...
आगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...
साखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...
देशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर  : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
इंडोनेशियात साखर दरावरुन वातावरण तापले कोल्हापूर: लॉकडाऊनमुळे इंडोनेशियात साखर जात...
आत्मनिर्भर भारत योजनेला मंजुरी :...नवी दिल्ली : आत्मनिर्भर (स्वावलंबी) भारत योजनेत...
कीडनाशकांवर बंदीबाबत उद्योगातून तीव्र...पुणे : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या २७ रासायनिक...
काढणी-मळणी यंत्रांना मागणी वाढण्याची...पुणे: कोविड १९ साथीनंतर तयार झालेल्या आपत्कालिन...
देशातून ३६ लाख टन साखर निर्यात पुणे: देशातील साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी...
धोरणं बदलल्यास खाद्यतेलात भारत...एके काळी दोन वेळच्या अन्नासाठी इतर देशांकडे हात...