जळगाव : शेळगाव बॅरेजवर ७५५ कोटी खर्चूनही पाणीसाठा नाही

जळगाव ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाली. २०० टीएमसी पाणी हतनूर धरणातून गुजरातला वाहून गेले. जिल्ह्यात वाहून जाणाऱ्या पाण्याला साठविण्याइतपत प्रकल्प कमी आहेत.
755 crore on Shelgaon Barrage There is no water supply at all
755 crore on Shelgaon Barrage There is no water supply at all

जळगाव ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाली. २०० टीएमसी पाणी हतनूर धरणातून गुजरातला वाहून गेले. जिल्ह्यात वाहून जाणाऱ्या पाण्याला साठविण्याइतपत प्रकल्प कमी आहेत. शेळगाव बॅरेजचे (ता. जळगाव) काम २०१८ मध्येच पूर्ण होईल, असे आश्‍वासन तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. मात्र अजूनही धरणाचे काम पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे १९९७-९८ मध्ये धरणाच्या कामास सुरवात झाली. आज तब्बल २३ वर्षे झाली, तरीही काम अपूर्ण आहे. सोबतच प्रकल्प उभारणीची किंमत तब्बल पाचपट वाढली आहे. १९८ कोटी पाच लाखांचा असलेला प्रकल्प आज ९६८ कोटींचा झाला आहे. 

शेळगाव बॅरेजच्या मध्यम प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काम भौतिकदृष्ट्या ८५ टक्के पूर्ण झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. असे असले तरी आजच्या स्थितीत पाणीसाठा निर्मिती निरंक असल्याची माहिती तापी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केली आहे. 

धरणाच्या कामाच्या सुरवात करायची. अनेक वर्षे त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करायचे. जेव्हा प्रकल्प उभारणीच्या किमतीत वाढ होते, तेव्हा सत्ताधारी राजकीय पक्षाकडून वाढीव निधी मंजूर करायचा, असे चक्र वर्षानुवर्षे सुरू आहे. राज्यात कोणाचीही सत्ता येवो धरणाचे काम पूर्ण करण्यासाठी निधीची घोषणा केली जाते. मात्र निधी दिला जात नाही. यामुळे मात्र धरणाच्या कामावर झालेल्या खर्चाचा ताण सर्वसामान्यांवर पडतो. प्रकल्पात शून्य टक्का पाणी साठते. धरणात पाणीच नसल्याने शेतकरी, इतरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. 

या प्रकल्पाची मूळ प्रशासकीय किंमत १९९७-९८ मध्ये १९८ कोटी पाच लाख होती. २०११-१२ मध्ये ती किंमत ६९९ कोटी ४८ लाखांपर्यंत गेली. तिला प्रशासकीय मान्यता मिळाली. २०१६-१७ मध्ये द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता ९६८ कोटी ९७ लाखांची ठेवण्यात आली. ती २०१९ मध्ये मंजूर करण्यात आली. योजना आयोगाची मान्यता मिळण्यासाठी कार्यवाही सुरु आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com