पुणे जिल्ह्याला ‘निसर्ग’च्या नुकसानीपोटी ७६ कोटींचा निधी

पुणे : जून महिन्यात आलेल्या चक्रिवादळाने जिल्ह्यात मोठे नुकसान केले. त्याच्या नुकसान भरपाईसाठी ७६ कोटींचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे.
  76 crore for for `Nisarga` losses in Pune district
76 crore for for `Nisarga` losses in Pune district

पुणे : जून महिन्यात आलेल्या चक्रिवादळाने जिल्ह्यात मोठे नुकसान केले. त्याच्या नुकसान भरपाईसाठी ७६ कोटींचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. ही नुकसान भरपाई प्राधान्याने घरे, गोठ्यांची पडझड, दगावलेल्या पशुधनासाठी देण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे सांगण्यात आले. 

या वादळात ११० कोटींच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनला पाठविला होता. जूनमध्ये चक्रीवादळाचा प्रामुख्याने फटका जिल्ह्याच्या पश्‍चिम घाट परिसरातील डोंगर भागातील तालुक्यांना बसला होता. यामध्ये प्रामुख्याने जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांचा समावेश होता.

या परिसरातील पॉलिहाऊसेससह, शेडनेट, घरे, गोठ्यांसह पशुधन आणि पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीसाठी ११० कोटींच्या निधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. त्यामधील ७६ कोटींचा निधी बुधवारी (ता.३०) जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला, असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी सांगितले. 

जिल्ह्यात दीड हजार कच्च्या घरांचे, १०० पक्क्या घरांचे, ५७ अंगणवाडी, ३१ शाळा, ४ ग्रामपंचायतींसह ४०२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com