राज्यात ऑगस्ट महिन्यात ७६ टक्के पाऊस

राज्यात ऑगस्ट महिन्यात ७६ टक्के पाऊस

पुणे : जुलै महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने मारलेली दडी ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीलाही कायम होती. पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतरही महिन्यातील पावसाची सरासरी भरून निघाली नाही. आॅगस्ट महिन्यात राज्यात सरासरी २३१.२ मिलिमीटर म्हणजेच अवघा ७६.२ टक्के पाऊस पडल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. सुरवातीला पडलेला खंड, अनेक भागात मारलेली दडी, कमी काळात दमदार पाऊस आणि सातत्याने होत असलेली उघडीप हे आॅगस्ट महिन्याच्या पावसाचे वैशिष्ट्ये दिसून आले.   महिन्याच्या सुरवातीला राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत होता. त्यानंतर १३ ऑगस्टच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. कोकण, मध्य मध्य महाराष्ट्रात सर्वसाधारण पाऊस कोसळत असताना, राज्याच्या दक्षिण भागात असलेल्या जिल्ह्यांमध्ये पावसाने जोर धरला, मराठवाडा, विदर्भात तर पावसाने अक्षरश: धुमशान घातले. गडचिरोली धुवाधार पावसाची नोंद झाली. मात्र उर्वरीत भागात पावसाची दडी कायम होती. १६ ऑगस्टनंतर राज्यात सर्वदर दमदार पावसाने हजेरी लावली. २० ते २२ अाॅगस्ट या कालावधीत पावसाने मुक्त उधळण केली. यामुळे आगस्टच्या सरासरीतील तूट भरून येण्यास मदत झाली. या पावसाने नद्या ओसंडून वाहिल्या, धरणे आव्हर फ्लो झाली. पुणे जिल्ह्यातील धरणे आेसंडून वाहिल्याने सर्वाधिक क्षमतेचे उजनी धरण २७ ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले. त्यांनतर मात्र राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतच होता. धरण क्षेत्रातही पावसाची रिमझिम सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग सुरूच होता. 

राज्यात विविध तालुक्यांत पडलेल्या पावसाची  टक्केवारी : २५ ते ५० टक्के पाऊस  भिवंडी ४३.७ (ठाणे), मुरूड ४१.१, श्रीवर्धन ३८.४ (रायगड), वैभववाडी ४३.३ (सिंधुदुर्ग), वाडा ३६.३, वसई ३८.८ (पालघर), मालेगाव ४५.९, इगतपुरी ४५.३, सिन्नर ४९.९ (नाशिक), कर्जत ४५.७ (नगर), इंदापूर ४८.६ (पुणे), अक्कलकोट ३८.२, माढा २९.४, पंढरपूर ३५.४, सांगोला ३०.५, माळशिरस ४३.४ (सोलापूर), कोरेगाव ४२.४, माण-दहिवडी ३१.७, फलटण २६.४, वाई ४२ (सातारा), तासगाव ४७.१, कवठेमहांकाळ ३८ (सांगली), भूम ३१.३, उमरगा ४४.६, लोहारा ४५.६ (उस्मानाबाद), मोर्शी ४६.७, वरूड ३५.८ (अमरावती), यवतमाळ ३७, राळेगाव ४२.८ (यवतमाळ), आर्वी ४३.१, करंजा ४०, आष्टी ३६.९, वर्धा ४०.३, सेलू ४३.८, हिंगणघाट ४५.२ (वर्धा), हिंगणी ४८, काटोल ३५.१, नरखेड ३१, कळमेश्‍वर ३८ (नागपूर), गोंडपिंपरी ३८.१, वरोरा ३०.२ (चंद्रपूर).  ५० ते ७५ टक्के पाऊस  ठाणे ५५.७, कल्याण ५०.७, शहापूर ६५.३, उल्हासनगर ७०.३ (ठाणे), अलिबाग ६९.६, पनवेल ६३.२, खालापूर ६५, उरण ६४.८, सुधागड ५४, पेण ६७.८, रोहा ६२.९, पोलादपूर ६३.५ (रायगड), रत्नागिरी ७०.९, राजापूर ७१.४ (रत्नागिरी), मालवण ७४, वेंगुर्ला ५२.४ (सिंधुदुर्ग), डहाणू ५८.७, पालघर ५०, जव्हार ५३.७, विक्रमगड ५३ (पालघर), त्र्यंबकेश्‍वर ७३.१, देवळाली ७०.१ (नाशिक), शिरपूर ७१.९ (धुळे), नंदूरबार ६६.१, शहादा ७१, तळोदा ७०.५ (नंदुरबार), जळगाव ६७, यावल ७०.५, अमळनेर ६७.८, चापेडा ६५, भडगाव ६७.८ (जळगाव), पारनेर ६१.२, श्रीगोंदा ६१.२, जामखेड ६९.९ (नगर), पुणे शहर ६८.४, वेल्हा ६४.३, शिरूर ७१, दौंड ६१.२ (पुणे), उत्तर सोलापूर ६०.६, दक्षिण सोलापूर ७०.६, मोहोळ ५४.८, मंगळवेढा ५४.३ (सोलापूर), मिरज ७०.१, जत ६२.७, खानापूर ५८.३, पलूस ६०.९ (सांगली), हातकणंगले ५५.३, पन्हाळा ७४.६, राधानगरी ६४.५, बावडा ७२.४ (कोल्हापूर), अंबाजोगाई ७४.१, वाडवणी ७०.५, शिरूर कासार ५२.९ (बीड), औसा ७०.५, देवणी ५४.५, शिरूर अंनतपाळ ६७ (लातूर), उस्मानाबाद ५४.५, परांडा ५७.६, कळंब ७०.६, वाशी ७३ (उस्मानाबाद), सेनगाव ७२.१ (हिंगोली), खामगाव ५३.७, नांदूरा ७१.१ (बुलडाणा), चिखलदरा ७१.२, अमरावती ७१.७, तिवसा ६५.८, अंजनगाव ५५.८, अचलापूर ६२.९, चांदूरबाजार, धामनगाव रेल्वे ७०.१ (अमरावती), बाभूळगाव ५१.४, कळंब ५१.४, मारेगाव ६०, केळापूर ६६.६ (यवमताळ), देवळी ६०.७, समुद्रपूर ५२.१ (वर्धा), नागपूर ग्रामीण ७१.३, सावनेर ६४.३, उमरेड ५८.१, भिवापूर ६५.५ (नागपूर), पवनी ७१.१, साकोली ७४ (भंडारा), गोरेगाव ६९, सालकेसा ५६.९, देवरी ७१.३ (गोंदिया), चंद्रपूर ६९, मूल ५६.३, भद्रावती ७२.१, चिमूर ६४.१, नागभिड ५२.५, सिंदेवाही ५७.९, राजूरा ६३.१ पोंभुर्णा ५५.७ (चंद्रपूर).  ७५ ते १०० टक्के पाऊस  अंबरनाथ ८२.२ (ठाणे), कर्जत ९९.५, महाड ८३.३, माणगाव ८८.७, रोहा, म्हसळा ८४.२, तळा ८९.५ (रायगड), चिपळूण ९६.६, दापोली ८६.२, खेड ९१.१, मंडणगड ९१.६, संगमेश्‍वर ९४.५, लांजा ८८.१ (रत्नागिरी), देवगड ९९.५, मालवण ७४, कणकवली ८७.२, कुडाळ ८९.५, दोडामार्ग ८४ (सिंधुदुर्ग), मोखडा ७५.२, तलसरी ९६.५ (पालघर), नांदगाव ७९.४, सुरगाणा ७६.९, चांदवड ९२.१ (नाशिक), शिंदखेडा ९०.२ (धुळे), नवापूर ८९.७, अक्कलकुवा ७६.३ (नंदूरबार), भुसावळ ८७.४, मुक्ताईनगर ९१.४, पारोळा ७८.५, चाळीसगाव ८५.५, जामनेर ८४.८, पाचोरा ७९.६, धरणगाव ८६.५, बोदवड ८९.७ (जळगाव), शेवगाव ८८.६, पाथर्डी ७९.६, राहूरी ९८.२ (नगर), हवेली ८९.९, आंबेगाव ८२.८, पुरंदर ८७ (पुणे) बार्शी ८७ (सोलापूर), सातारा ९०.१, जावळीमेढा ९१.९, कराड ७९, खंडाळा ९४.७ (सातारा), इस्लामपूर ९३.७, कडेगाव ८४.२ (सांगली), शिरोळ ८४.२, चंदगड ७८ (कोल्हापूर), पैठण ८३.५, खुलताबाद ८३.६, सिल्लोड ८७.२, सोयगाव ७६.३ (औरंगाबाद), भोकरदन ९२, जाफराबाद ९५.६, अंबेड ८८.७ (जालना), बीड ८६.१, पाटोदा ८७.४, आष्टी ७८.९, गेवराई ८०.२, माजलगाव ९०, परळी ९५.२, धारूर ८४.९ (बीड), लातूर ८४.२, अहमदपूर ९६.४, निलंगा ७९.९, उदगीर ७५.३, चाकूर ८९.६, जळकोट ९८.२ (लातूर), तुळजापूर ७८.८ (उस्मानाबाद), बिलोली ८८.५, देगलूर ७५.७, नायगाव (खैरगाव) ८२.९ (नांदेड), परभणी ७९.१, गंगाखेड ७९, पाथरी ९८.४, जिंतूर ९४.५, पालम ७८.८, सेलू ९४.५, सोनपेठ ९०.५, मानवत ९१.२ (परभणी), हिंगाली ७९, कळमनुरी ९०.२, बसमत ७६ (हिंगोली), चिखली ८९, मेहकर ९७, शेगाव ८५.५, मलकापूर ८७.६ (बुलडाणा), अकोट ७७.१, तेल्हारा ७७.२, बाळापूर ९६.२, अकोला ९६.९, बाळापूर ९६.२, अकोला ९३.८, मुर्तिजापूर ९६.९ (अकोला), वाशीम ८४.५, मंगरुळपीर ९०.७ (वाशीम), धारणी ८२.७, भातकुली ९३.३, चांदूर रेल्वे ८१.७, चांदूरबाजार ९४.९ (अमरावती), दारव्हा ८६.६, नेर ९८.३, वणी ८८.१, झरी झामनी ८८.१, घाटंजी ७८.७ (यवतमाळ), नागपूर शहर ७८.८, पारशिवणी ८९.९ (नागपूर), भंडारा ९५, मोहाडी ९०.६, तुमसर ९०.१, लाखंदूर ७५.६, लाखनी ८१.९ (भंडारा), गोंदिया ७९, आमगाव ७९.४, तिरोडा ७७.९, मोरगाव अर्जुनी ७५.८, सडक अर्जुनी ८९.३ (गोंदिया), बह्मपुरी ७५.२ (चंद्रपूर), गडचिरोली ७७.९, कुरखेडा ८३.६, अरमोरी ९२.१, चामोर्शी ७५.६, धानोरा ८८.५, कोर्ची ८१.५ (गडचिरोली).  १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस  मुरबाड १००.३ (ठाणे), गुहाघर १७४.६ (रत्नागिरी), सावंतवाडी ११३ (सिंधुदुर्ग), बागलाण १०६.८, कळवण १२२, सुरगाणा १००.७, दिंडोरी १५२.६, निफाड १०३.६, येवला १३७.४ (नाशिक), धुळे १११.५, साक्री १९१.१ (धुळे), अक्राणी १००.१ (नंदूरबार), रावेर १०५.८ (जळगाव), नेवासा ११३.६, संगमनेर १०३.७, कोपरगाव १२४.५, श्रीरामपूर १०३, राहाता ११५.१ (नगर), मुळशी १५६, भोर १८२.२, जुन्नर १७१.७, खेड १६३.७ (पुणे), पाटण १०१.९, खटाव १०२.९ (सातारा), शिराळा १८०.२ (सांगली), कोल्हापूर १२१.९, कागल १८१, गडहिंग्लज १०१.८, भुदरगड १५७, आजरा १०२.३ (कोल्हापूर), औरंगाबाद ११६.१, गंगापूर १०२.९, वैजापूर १४०.५, कन्नड ११३.८, फुलांब्री १२६.१ (औरंगाबाद), जालना १२८.४, परतूर ११०, बदनापूर १३४.१, घनसांगवी १०३.३, मंथा १४७.८ (जालना), केज १२३.३ (बीड), रेणापूर १२१.१ (लातूर), नांदेड १३१.५, मुखेड ११५.७, कंधार १४५.५, लोहा १२५.१, हदगाव १२०.७, भोकर १६८.२, किनवट ११६, मुदखेड १६६.१, हिमायतनगर १४८.३, माहूर १२७.३, धर्माबाद १०१.८, उमरी १४७.६, अर्धापूर १६३.७ (नांदेड), पुर्णा १३६ (परभणी), औंढा १३७.१ (हिंगोली), जळगाव-जामोद ११८.९, संग्रामपूर ११७.३, बुलडाणा १०६.२, देऊळगाव राजा १२७.२, सिंदखेड राजा १०६.२, लोणार १३४.४, मोताळा १०४.५ (बुलडाणा), पातुर १०९.९, बार्शीटाकळी १८७.६ (अकोला), मालेगाव १०२.१, मानोरा १३२.९, कारंजालाड १४१ (वाशीम), नांदगाव खंडेश्‍वर १९४.९, दर्यापूर १०४, (अमरावती), दिग्रस ११९.९, अर्णी १४९.५, पुसद ११६.७, उमरखेड १०५.६, मोहगाव १०७.२ (यवतमाळ), कामठी १०९.९, रामटेक ११०.३, मौदा १३१.८, कुही १०२.७ (नागपूर), कोपर्णा १३०.६, सावळी १००.१, बल्लारपूर १५५.३, जेवती १३१.८ (चंद्रपूर), सिरोंचा १९४.५, आहेरी १५९.१, एटापल्ली १०७.२, देसाईगंज ११७, मुलचेरा १३४, भामरागड १७९.६ (गडचिरोली). मॉन्सूनचा आस ठरला परिणामकारक बंगालच्या उपसागरात एका पाठोपाठ एक अशी तीन कमी दाब क्षेत्र तयार हाेऊनही ऑगस्ट महिन्यात पावसाने सरासरी गाठली नाही. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सुरवातीला उत्तरेकडे सरकून गेल्याने उत्तर भारतात पावसाचे प्रमाण वाढले, मात्र महाराष्ट्रात पावसाची उघडीप दिसून आली. कमी दाब क्षेत्र तयार होऊनही ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत पावसात खंड होता. मॉन्सूनचा आस दक्षिणेकडे येताच राज्यात सर्वदूर पाऊस सुरू झाला. कमी दाब क्षेत्राने मॉन्सूनचे प्रवाह बळकट झाले, तर राज्यातील हवेच्या वरच्या थरात तयार झालेले पूर्व-पश्‍चिम जोडक्षेत्र पावसाला पोषक ठरले. नंतर माॅन्सूनचा आस उत्तरेकडे सरकला आणि पुन्हा पावसाचा जोर आेसरत गेला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com