साडेसात हजार क्विंटल हरभऱ्याची हमीभावने खरेदी 

खुल्या बाजारातील दर आवक वाढल्यानंतर काहीसे कमी झाले आहेत. त्यामुळे नोंदणीकृत शेतकरी शासकीय केंद्रांवर हरभऱ्याची विक्री करु लागले आहेत.
gram
gram

परभणी, हिंगोली : खुल्या बाजारातील दर आवक वाढल्यानंतर काहीसे कमी झाले आहेत. त्यामुळे नोंदणीकृत शेतकरी शासकीय केंद्रांवर हरभऱ्याची विक्री करु लागले आहेत. शनिवारपर्यंत (ता.२०) परभणी जिल्ह्यातील ४ आणि हिंगोली जिल्ह्यातील ३ केंद्रांवर आधारभूत किंमत दराने (प्रतिक्विंटल ५१०० रुपये) एकूण ७०३ शेतकऱ्यांचा ७ हजार ६२१ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. 

या दोन जिल्ह्यांतील १५ केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी शनिवारपर्यंत (ता.२०) १४ हजार २५२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. परभणी जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघाच्या सात केंद्रावर गुरुवारपर्यंत (ता.१८) ५ हजार ६५० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. हिंगोली जिल्ह्यातील सहा केंद्रांवर ६ हजार ११६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. परभणी जिल्ह्यातील १ हजार ११२ आणि हिंगोली जिल्ह्यातील १ हजार ११८ नोंदणीकृत शेतकऱ्यांना केंद्रावर हरभरा विक्रीस आणण्यासाठी एसएमएस पाठविण्यात आले आहेत. शनिवारपर्यंत (ता.२०) परभणी जिल्ह्यातील चार केंद्रांवर २०८ शेतकऱ्यांचा २ हजार ८४ क्विंटल आणि हिंगोली जिल्ह्यातील ३ केंद्रावर १०० शेतकऱ्यांचा १ हजार ६१७ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला, असे जिल्हा व्यवस्थापक के.जे. शेवाळे यांनी सांगितले.  खुल्या बाजारातील दरात नरमाई  विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या मानवत आणि गंगाखेड येथील केंद्रावर शनिवार (ता.२०) पर्यंत ३९५ शेतकऱ्यांचा ३ हजार ९२० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला असे जिल्हा व्यवस्थापक भागवत सोळंके यांनी सांगितले. या दोन जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याच्या दर गेल्या काही दिवसांत प्रतिक्विंटल ४ हजार २५० ते ४ हजार ५०० पर्यंत घसरले आहेत. त्यामुळे नोंदणीकृत शेतकरी शासकीय केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी नेत आहेत. परंतु अद्याप या दोन जिल्ह्यांतील ८ केंद्रावर हरभऱ्याची खरेदी झालेली नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com