Agriculture news in marathi 762 tur producers in Jalna wait for payment | Agrowon

जालन्यातील ७६२ तूर उत्पादकांना चुकाऱ्याची प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 मे 2020

जालना : जिल्ह्यातील सहा हमी दर खरेदी केंद्रांवरून ४१०४ शेतकऱ्यांकडील ३४ हजार २५० क्विंटल ३८ किलो तुरीची हमी दराने खरेदी करण्यात आली. त्यापैकी ७६२ शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे मिळणे बाकी आहे. 

जालना : जिल्ह्यातील सहा हमी दर खरेदी केंद्रांवरून ४१०४ शेतकऱ्यांकडील ३४ हजार २५० क्विंटल ३८ किलो तुरीची हमी दराने खरेदी करण्यात आली. त्यापैकी ७६२ शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे मिळणे बाकी आहे. 

जिल्ह्यात तुरीच्या खरेदीसाठी जालना, अंबड, तीर्थपुरी, मंठा, भोकरदन, परतूर या सहा ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. या केंद्रांवर ७३०९ शेतकऱ्यांनी आपल्या तुरीची खरेदी करण्यासाठी नोंदणी केली होती. त्यामध्ये जालना केंद्रावरील ३००६, अंबड ८४०, तीर्थपुरी ११८८, मंठा १३६४, भोकरदन ८३, परतूर येथील ८२८ शेतकरी होते. त्यांना तुरीच्या खरेदीसाठीचे एसएमएस पाठविण्यात आले. या शेतकऱ्यांपैकी ४१०४ शेतकऱ्यांकडून ३४ हजार २५० क्विंटल ३८ किलो तुरीची खरेदी करण्यात आली. त्यांपैकी ३३४२ शेतकऱ्यांच्या २८४३३ क्विंटल ५० किलो तुरीच्या चुकाऱ्यापोटी १६ कोटी ४९ लाख १४ हजार ३०० रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले. 

सुमारे ७६२ शेतकऱ्यांकडील ५८१६ क्विंटल ८० किलो तुरीच्या चुकाऱ्यापोटी ३ कोटी ३७ लाख ३७ हजार ९०४ रुपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहेत. जालना केंद्रावरील ८०, तीर्थपुरी केंद्रावरील ३८६, मंठा केंद्रावरील २३०, भोकरदन केंद्रावरील ६४, परतूर केंद्रावरील ५८ शेतकऱ्यांना चुकाऱ्यांची प्रतीक्षा आहे. 

हरभरा खरेदीसाठी ७५३५ शेतकऱ्यांची नोंदणी 

हरभरा खरेदीसाठी जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या पाच केंद्रांवरून ७५३५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी ५३४४ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठविण्यात आले. त्यांपैकी ३४६७ शेतकऱ्यांकडील ४८ हजार ५६४ क्विंटल २ किलो हरभऱ्याची प्रति क्विंटल ४ हजार ८७५ रुपये दराने खरेदी करण्यात आली. त्याच्या चुकाऱ्यापैकी १६०० शेतकऱ्यांना २२९८३ क्विंटल हरभऱ्याच्या चुकाऱ्यापोटी ११ कोटी २० लाख ४२ हजार १२५ रुपये अदा करण्यात आले. १८६७ शेतकऱ्यांच्या २५ हजार ५८१ क्विंटल हरभऱ्याचे चुकारे अजून देणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मका, ज्वारी भरड धान्य खरेदी नोंदणी सुरू 

मका व ज्वारी भरड धान्य खरेदी नोंदणी भोकरदन, जाफराबाद व जालना येथे सुरू करण्यात आली आहे. इतर तालुक्यांमध्ये नोंदण्या सुरू कराव्या, असे आदेश देण्यात आले. मक्याचा हमी दर १७६० रुपये प्रतिक्विंटल आहे. खरेदीसाठी मक्याची सरासरी उत्पादकता एकरी ११ क्विंटल ४३ किलो असल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी विमल वाघमारे यांनी दिली. 
 
 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...