मराठवाड्यातील ८५३५ पैकी ७६३७ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी

अतिवृष्टीच्या आघाताने नुकसान झालेल्या मराठवाड्यातील ८५३५ गावांपैकी ७६३६ गावांची खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आली आहे.
7637 out of 8535 in Marathwada The percentage of villages is less than 50 paise
7637 out of 8535 in Marathwada The percentage of villages is less than 50 paise

औरंगाबाद : अतिवृष्टीच्या आघाताने नुकसान झालेल्या मराठवाड्यातील ८५३५ गावांपैकी ७६३६ गावांची खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आली आहे. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्‍यातील ९८ गावांपैकी राणीवाहेगाव हे गाव बुडीत क्षेत्रात गेल्याने ९७ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली, तर लातूर जिल्ह्यातील ९५१ गावांपैकी ८९७ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त जाहीर करण्यात आल्याची माहिती विभागीय महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. साधारणत: तीन टप्प्यांत हंगामी, सुधारित व अंतिम अशा स्वरूपाची पैसेवारी जाहीर करण्याची पद्धत आहे. सप्टेंबर, ऑक्‍टोबर व डिसेंबर या महिन्यांत खरीप पिकांची पैसेवारी जाहीर केली जाते. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व १३५६ गावांची सुधारित पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. जालना जिल्ह्यातील सर्व ९७१, परभणी जिल्ह्यातील सर्व‌ ८४८, हिंगोली जिल्ह्यातील सर्व ७०७, नांदडमधील सर्व १५६२ बीडमधील सर्व १४०२, लातूरमधील केवळ निलंगा तालुक्‍यातील ५४, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व ७३७ गावांची खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ५० पैशाच्या आत आहे.

८९७ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त लातूर जिल्ह्यातील ८९७ गावांची खरीप पिकांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आली आहे. त्यामध्ये लातूर १२३, औसा १३३, रेणापूर ७६, उदगीर ९९, जळकोट ४७, अहमदपूर १२४, चाकूर ८५, निलंगा १०८, देवणी ५४, तर शिरूर अनंतपाळ तालुक्‍यातील ४८ गावांचा समावेश आहे.

५१ लाख १९ हजार ५५७ हेक्‍टरवर पेरणी खरीप पिकाच्या सुधारित पैसेवारी जाहीर करतानाच्या गोषवाऱ्यानुसार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८५३५ गावांत ५५ लाख ९१ हजार ३२९ हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली आहे. त्यापैकी ५१ लाख १९ हजार ५५७ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. या पेरणी झालेल्या क्षेत्रात औरंगाबाद ७ लाख १४ हजार ५८७ हेक्‍टर, जालना ६ लाख ४९ हजार ४५ हेक्‍टर, परभणी ५ लाख ३८ हजार ७१ हेक्‍टर, हिंगोली ३ लाख ७६ हजार २१३ हेक्‍टर, नांदेड ८ लाख १९९ हेक्‍टर, बीड ८ लाख २ हजार २७० हेक्‍टर, लातूर ६ लाख २५ हजार ९६४ हेक्‍टर तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ६ लाख १३ हजार २०६ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे.

४ लाख ७ हजार ८३९ हेक्‍टर क्षेत्र पडीक मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील ४ लाख ७ हजार ८३९ हेक्‍टर क्षेत्र पडीक आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ हजार ४४५ हेक्‍टर, जालना २६ हजार ८८१, परभणी २३ हजार ८९९, हिंगोली ६ हजार २१९, नांदेड २९ हजार ९३१, बीड १ लाख ४० हजार ६४६, लातूर २७ हजार ७५६ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ८७ हजार ६० हेक्‍टर क्षेत्राचा समावेश असल्याची माहिती महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com