सातारा जिल्ह्यात रब्बीच्या ७८.४९ टक्के पेरणी

सातारा जिल्ह्यात रब्बीच्या ७८.४९ टक्के पेरणी
सातारा जिल्ह्यात रब्बीच्या ७८.४९ टक्के पेरणी

सातारा ः जिल्ह्यातील रब्बी परेणी हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. जिल्ह्यात बुधवार (ता. २६) पर्यंत ७८.४९ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. पाणीटंचाईमुळे रब्बीतील नापेर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात आले आहे. रब्बी ज्वारी, हरभरा पिकांच्या पेरणीचा कालवधी संपला असून सध्या गहू पिकांची पेरणी सुरू आहे. अपुरा पाऊस झाल्याने पाणीटंचाई संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. यामुळे जिल्ह्यातील रब्बी क्षेत्र नापेर शक्यता व्यक्त केली जात आहे. 

या हंगामात कोणत्याही पिकांची सर्वसाधारण क्षेत्राइतकी पेरणी झालेली नाही. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे दोन लाख १४ हजार ८२३ हेक्‍टर असून, त्यापैकी (ऊस वगळून) एक लाख ६८ हजार ६१९ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच ७८.४९ टक्के पेरणी झाली आहे. 

अन्नधान्य व चाऱ्यासाठी उपयुक्त असलेल्या रब्बी ज्वारीची यंदा सर्वाधिक पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ३९ हजार १११ हेक्‍टर असून, त्यापैकी एक लाख १३ हजार ८४६ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ८८३ हेक्‍टर असून, त्यापैकी २२ हजार ९३२ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गहू पिकांची ३४ हजार ४७३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून गव्हाची २२ हजार १३४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. 

मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र १० हजार ९४१ हेक्‍टर असून, आठ हजार ९७९ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. दुष्काळी माण, खटाव तालुक्यांत पाण्याअभावी पिकांची परिस्थिती नाजूक होऊ लागली आहे. दुष्काळी स्थिती आताच निर्माण झाल्याने येत्या उन्हाळ्यात स्थिती भीषण होण्याचे संकेत असून उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात मात्र पिकांच्या अवस्था चांगली आहे.

तालुकानिहाय पेरणीक्षेत्र (हेक्‍टर) तालुकानिहाय पेरणीक्षेत्र (हेक्‍टर)- सातारा- १४,६०७, जावली- ५,५५३, पाटण- १३,३७२, कऱ्हाड- १०,१७०, कोरेगाव- २२,७१६, खटाव- २३,३०१, माण- २७,९८३, फलटण-२२,२८२, खंडाळा-१४,८३३, वाई- १३,३४७, महाबळेश्वर- ४५५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com