सातारा जिल्ह्यासाठी ८ कोटींचा टंचाई आराखडा मंजूर

सातारा जिल्ह्यासाठी ८ कोटींचा टंचाई आराखडा मंजूर
सातारा जिल्ह्यासाठी ८ कोटींचा टंचाई आराखडा मंजूर

सातारा : जिल्ह्यातील ६३२ गावांसाठी ८.२३ कोटीचा टंचाई आराखडा मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये ५५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून माण तालुक्यात सर्वाधिक ४२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तसंच टंचाई निवारणार्थ विविध उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. 

छत्रपती शाहू क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री. शिवतारे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, आमदार शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलिस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१८-१९ मध्ये शासनाच्या निकषाच्या अधिन राहून ९१ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांचे ८२० कामांचा आराखडे तयार करण्यात आले आहेत व यातील ४१४ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित कामे मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यातील तारळी, धोम, बलकवडी, कुडाळी, मोरणा गुरेघर व वांग ५ प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी केंद्र शासनाकडून ५९७ कोटी व राज्य शासनाकडून १९३५ कोटी असे एकूण २५३२ कोटी निधी प्राप्त होणार आहे. यातून ४७८४६ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. बळिराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील उरमोडी प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून १३४ कोटी व राज्य शासनाकडून ४०२ कोटी असे एकूण ५३६ कोटी निधी प्राप्त होणार आहे. यातून १४८१६ हेक्टर क्षेत्रास सिचंनाचा लाभ होणार आहे. 

उरमोडी प्रकल्पांतर्गत सातारा तालुक्यातील कालवे व उपसा सिंचन योजना, खटाव कालवा व माण कालव्याद्वारे सातारा, खटाव व माण या तालुक्यांतील ११० गावातील २७७५० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. 

कोयना धरणग्रस्तांचे १०० टक्के पुनर्वसन झालेले नसल्यामुळे कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात वेगवान सोडवणूक आणि विकसनशिल पुनर्वसन प्रक्रिीया वेगवान होण्यासाठी अपर मुख्य सचिव (मदत व पुनर्वसन) यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आलेली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com