नांदेड विभागातील आठ कारखान्यांचे ऊसगाळप बंद

8 factories closed in Nanded division
8 factories closed in Nanded division

नांदेड : प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गंत नांदेड विभागातील चार जिल्ह्यांतील १३ पैकी ८ साखर कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे. हे सर्व कारखाने परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील आहेत. रविवार (ता. १५) पर्यंत नांदेड विभागातील साखर कारखान्यांनी २७ लाख ६७ हजार ६४१ टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.७३ टक्के साखर उताऱ्याने एकूण २९ लाख ६९ हजार ९८५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.

रविवार  (ता.१५) पर्यंत ऊस गाळप हंगाम बंद झालेल्या कारखान्यांमध्ये परभणी जिल्ह्यातील २, हिंगोलीतील ३ आणि नांदेडमधील ३ साखर कारखान्यांचा समावेश आहे. 

नांदेड विभागातील चार जिल्ह्यांतील १७ साखर कारखान्यांना यंदाच्या हंगामात ऊस गाळपाचे परवाने मिळाले. परंतु १३ कारख्यान्यांनी ऊस गाळप सुरु केले. रविवार (ता.१५) पर्यंत परभणीतील ५ पैकी ३ खासगी कारखान्यांनी ६ लाख १६ हजार ४१४ टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.८४ टक्के उताऱ्याने ६ लाख ६८  हजार ३६० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. पूर्णा तालुक्यातील बळिराजा शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक ११.४४ टक्के एवढा आला. त्रिधारा शुगर्स आणि योगेश्वरी शुगर्स या दोन साखर कारखान्यांचे गाळप हंगाम बंद झाले आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील ३ सहकारी  आणि १ खासगी अशा ४ साखर कारखान्यांनी ७ लाख ६७ हजार १०१ टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.९२ टक्के उताऱ्याने ८ लाख ३७ हजार ८०० क्विंटल साखर उत्पादन घेतले. भाऊराव चव्हाण सहकारी साखर (युनिट २ )कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक ११.३ टक्के आला. पूर्णा सहकारी साखर कारखाना, टोकाई सहकारी साखर कारखाना, शिऊर शुगर्स या तीन साखर कारखान्यांचे ऊस गाळप बंद झाले आहे.

नांदेडमधील  ४ पैकी २ सहकारी, २ खासगी कारखान्यांनी ८ लाख ११ हजार ४१५ टन उसाचे गाळप करून सरासरी १०.६६ टक्के साखर उताऱ्याने ८ लाख ६४ हजार ८२५ क्विंटल साखर उत्पादन घेतले. लातूरमधील २ खासगी कारखान्यांनी ५ लाख ७२ हजार ७१० टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.४६ टक्के उताऱ्याने ५ लाख ९९ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले. 

जिल्हानिहाय ऊसगाळप स्थिती

जिल्हा कारखाने संख्या ऊसगाळप (टन) साखर उत्पादन(क्विंटल)  साखर उतारा (टक्के)
परभणी  ३  ६१६४१४.८६ ६६८३६० १०.८४
हिंगोली ७६७१०१ ८३७८००  १०.९२
नांदेड ८११४१५ ८६४८२५ १०.६६
लातूर  ५७२७७१० ५९९०००  १०.४६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com