राज्यात होणार आठ लाख शौचालये

राज्यात होणार आठ लाख शौचालये
राज्यात होणार आठ लाख शौचालये

नगर ः राज्य हागणदारीमुक्त झाल्याची सहा महिन्यांपूर्वीच शासनाकडून घोषणा करण्यात आली असली तरी अजूनही राज्यातील ८ लाख ३७ हजार २१४ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालये नाहीत. शौचालय नसलेल्या आणि बेसलाईन सर्व्हेमध्ये नावे नसलेल्या कुटुंबांची पाणी व स्वच्छता विभागाने नुकतेच सर्वेक्षण केले. त्यात ही बाब स्पष्ट झाली. शौचालय नसलेल्या कुटुंबांची स्वच्छ भारत अभियानच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असून शौचालय बांधून घेतली जाणार आहेत.  ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालये बांधून त्याचा वापर करावा यासाठी शासनाकडून गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी शासन १२ हजार रुपयाचे अनुदान दिले जाते. शौचालय नसलेल्या कुटुंबांचे आठ वर्षापूर्वी सर्वेक्षण करून त्याची नावे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानच्या संकतस्थळावर नोंदणी करुन बेसलाइन सर्व्हेच्या यादीत नावाचा समावेश झाला. गेल्या चार वर्षात यावर भर देऊन बेसलाइन सर्व्हेत नाव असलेल्या कुटुंबांनी शंभर टक्के शौचालय बांधली आणि राज्य हागणदारीमुक्त झाल्याची शासनाने घोषणा केली.  बेसलाइन सर्व्हेच्या यादीनुसार हागणदारीमुक्तीची घोषणा झाली असली तरी त्यात नावे नसलेल्या अनेक कुटुंबांकडे शौचालय नसल्याची बाब समोर आली. त्यानुसार गेल्या काही महिन्यात पाणी व स्वच्छता विभागाने सर्वेक्षण केल्यावर राज्यभरात ८ लाख ३७ हजार २१४ कुटुंबाकडे शौचालये नसल्याची बाब स्पष्ट झाली. आता या कुटुंबांना अनुदान देऊन वैयक्तिक शौचालये बांधून घेतली जाणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानच्या संकेतस्थळावर ८ लाख ३७ हजार २१४ कुटुंबांची नोंदणी केलेली असल्याचे सांगण्यात आले. नव्याने होणाऱ्या शौचालयात औरंगाबाद, बीड, नांदेड, जळगाव जिल्ह्यामध्ये संख्या अधिक आहे. ही शौचालये झाल्यावरच खरया अर्थाने राज्य हागणदारीमुक्त होणार आहे.  जिल्हानिहाय नव्याने होणारी शौचालये गडचिरोली ः २७४८२, जालना ः ३७३७७, भंडारा ः १८२४७, अकोले ः ६४९०, नाशिक ः ३६८५३, चंद्रपुर ः १४६०१, वर्धा ः ९०२७, यवतमाळ ः १९४०५, बीड ः ६८८६४, सोलापुर ः २५३३९, बुलढाणा ः २९६११,गोंदिया ः १८३०८, औरंगाबाद ः ६७७९९, नांदेड ः ४७१६९, नंदुरबार ः २६०९९, नगर ः ३७१२३, सांगली ः २६४८६, अमरावती ः ३१४६२, नागपूर ः ९८३५, हिंगोली ः २२३६७, उस्मानाबाद ः ४४४६८, लातूर ः २४२६२, रायगड ः ८५१६, धुळे ः ६५९९, जळगाव ः ६३८७८, वाशीम ः १३९४०, सातारा ः १४४४८, कोल्हापूर ः १५७७२, रत्नागिरी ः ७१२२, पुणे  ः११८८७, सिंधुदुर्ग ः ६६९६, ठाणे ः ४३०२, पालघर ः १०८८८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com