विधानपरिषदेच्या ८ सदस्यांची मुदत समाप्त

विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त ८ सदस्यांची मुदत शुक्रवारी (ता.६) संपली आहे. तर अन्य दोन सदस्यांची मुदत १५ जूनला संपुष्टात येणार आहे.
विधानपरिषदेच्या ८ सदस्यांची मुदत समाप्त
विधानपरिषदेच्या ८ सदस्यांची मुदत समाप्त

मुंबई: विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त ८ सदस्यांची मुदत शुक्रवारी (ता.६) संपली आहे. तर अन्य दोन सदस्यांची मुदत १५ जूनला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे विधानपरिषदेवरील राज्यपाल नामनियुक्तीसाठी आघाडीत मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. जून २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारच्या शिफारशीनुसार राज्यपालांनी १२ सदस्यांची विधानपरिषदेवर नामनियुक्त सदस्य म्हणून वर्णी लावली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा, काँग्रेसच्या पाच आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या एका सदस्याचा समावेश होता. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल नार्वेकर आणि रामराव वडकुते यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तेव्हापासून राज्यपाल नामनियुक्त दोन जागा रिक्त आहेत. त्यामुळे उर्वरित आठ सदस्यांनी काल, ६ जून रोजी विधानपरिषदेचा निरोप घेतला. तर अन्य दोन सदस्य १५ जूनला निवृत्त होतील.दरम्यान, महाराष्ट्र विकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षात राज्यपाल नामनियुक्त १२ जागांचे वाटप प्रत्येकी चार जागा असे होण्याची शक्यता आहे. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसने एकच जागा लढवली होती. त्यामुळे  राज्यपाल नामनियुक्तीत काँग्रेसला अतिरिक्त जागा मिळू शकते. विधानपरिषदेत रिपब्लिकन पक्षाला पुन्हा प्रतिनिधित्व देण्याचा शब्द काँग्रेसने पाळावा, अशी मागणी जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पक्षाने काँग्रेसकडे केली आहे.

१५ जूनला निवृत्त होणारे सदस्य काँग्रेस : अनंत गाडगीळ रिपब्लिकन पक्ष : जोगेंद्र कवाडे

 ६ जूनला निवृत्त झालेले सदस्य काँग्रेस : हुस्नबानू खलिपे, जनार्दन चांदूरकर, आनंदराव पाटील, रामहरी रुपनवर राष्ट्रवादी काँग्रेस : प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण, ख्वाजा बेग, जगन्नाथ शिंदे  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com