Agriculture news in marathi, 8% subsidy for drip dry villages | Agrowon

ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला मिळाले यश

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू गावांना ठिबकसाठी ८० टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी करून मंगळवेढा तालुक्यातील ४५ गावांनी वर्षभरापूर्वी आंदोलन केले होते. निव्वळ पावसावर अवलंबून असणाऱ्या या गावांनी केलेल्या आंदोलनातली ठिबकची ही प्रमुख मागणी होती, अखेरीस शासनाने ही मागणी मान्य केल्याने या आंदोलनाला यश मिळाले. 

भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू गावांना ठिबकसाठी ८० टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी करून मंगळवेढा तालुक्यातील ४५ गावांनी वर्षभरापूर्वी आंदोलन केले होते. निव्वळ पावसावर अवलंबून असणाऱ्या या गावांनी केलेल्या आंदोलनातली ठिबकची ही प्रमुख मागणी होती, अखेरीस शासनाने ही मागणी मान्य केल्याने या आंदोलनाला यश मिळाले. 

या आंदोलनाचे निमंत्रक कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी याबाबत शासनाचे आभार मानले. एक वर्षापूर्वी मंगळवेढा तालुक्यातील निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या कोरडवाहू ४५ गावांनी कायम दुष्काळी गावांना ठिबकसाठी ९०% अनुदान द्यावे, पावसावर अवलंबून गावांना कोरडवाहू गावांचा दर्जा देऊन कोरडवाहू शेती विकास महामंडळ स्थापन करावे, आदिवासी भागांसारख्या योजना या कोरडवाहू गावांना देऊन विकास करावा, आदी मागण्यांसाठी बैलगाडी, जनावरांसह मंगळवेढ्यात रास्ता रोको आंदोलन केले.

धरणे आंदोलनासह अनेक तीव्र आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. आमदार भारत भालके यांनीही विधानसभेत या विषयावर चर्चा घडवून आणली. या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने कोरडवाहू गावांना ठिबकसाठी ८० टक्के अनुदान जाहीर केले. याची अंमलबजावणी तात्काळ करावी, अशी मागणी संघर्ष समितीचे सदस्य बापूसाहेब मेटकरी व अशोक भगरे यांनी केली. 
 


इतर बातम्या
अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या...अकोला ः जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे...
दापोली कृषी विद्यापीठातर्फे बांधावर...रत्नागिरी ः दापोली कृषी विद्यापीठाच्या विस्तार...
मालेगाव बाजार समितीची मुख्यमंत्री...वाशीम ः कोरोनाविरुद्ध उपाययोजना करण्यास मदत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३७ हजार क्विंटल...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात ३६ हजार...
अकोल्यात अकरा कोटींच्या निविष्ठा...अकोला ः आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावर...
भंडारा जिल्ह्यात ५० हजारांवर मजुरांना...भंडारा ः लॉकडाऊन काळात आर्थिक आधार म्हणून...
खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...जळगाव ः खरीप हंगाम तोंडावर आल्याने...
यंत्रमागाद्वारे रोजगाराचा प्रश्न सुटेल...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘प्रतिबंधित...
खानदेशातील टंचाईग्रस्त भागात बऱ्यापैकी...जळगाव : खानदेशात टंचाईच्या झळा बसणाऱ्या धुळ्यातील...
अटीशर्तीविना मका खरेदी करा खासदार डॉ....नाशिक : केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी...
परभणीत सोयाबीन बियाण्यांचे नापासाच्या...परभणी  ः सोयाबीनमध्ये बियाणे नापासाचे प्रमाण...
जालन्यात १२ हजारावर शेतकऱ्यांनी तपासली...जालना : कृषी विभागातर्फे जिल्ह्यात एकाच दिवशी...
शेतकऱ्यांनो कृषी निविष्ठांची पावती...नांदेड : शेतकऱ्यांनी येत्या खरीप हंगामासाठी खते,...
नगर जिल्ह्यात ९३ टॅंकरव्दारे पाणीपुरवठानगर  ः नगर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता...
नगरमध्ये उद्योग सुरू; पण मजुरांची वानवानगर  ः लॉकडाउन शिथिल करताना केंद्र व राज्य...
नांदेड जिल्ह्यात ७० हजार क्विंटलवर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतंर्गंत...
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या खरेदीदारांकडून...हिंगोली : जिल्ह्यातील बाजार समित्यांतील हळदीच्या...
नगर, पारनेर, नेवासेत कांदा लिलाव बंदचनगर  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन...
अंबडमध्ये कापूस खरेदीसाठी दोन...अंबड, जि. जालना : येथील मे सुरज ॲग्रोटेकच्या...