Agriculture news in Marathi 80 per cent for Gram Panchayat, 10 per cent for ZP, 10 per cent for Panchayat Samiti | Agrowon

नाशिक : ग्रामपंचायतीला ८० टक्के, झेडपी, पंचायत समितीला १० टक्के निधी

संतोष विंचू
शनिवार, 4 जुलै 2020

येवला, जि. नाशिक : गेली पाच वर्षे १४ व्या वित्त आयोगाचा १०० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना मिळत होता. आता पुढील पाच वर्षांसाठी पंधरावा वित्त आयोग लागू झाला असून, त्याचे स्वरूप बदलत ग्रामपंचायतींना ८० टक्के तर जिल्हा परिषद व पंचायत समितीला प्रत्येकी दहा टक्के निधी देण्याचा निर्णय झाल्याने या दोन्ही संस्थांच्या सदस्यांतून बदलाचे स्वागत होत आहे.

येवला, जि. नाशिक : गेली पाच वर्षे १४ व्या वित्त आयोगाचा १०० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना मिळत होता. आता पुढील पाच वर्षांसाठी पंधरावा वित्त आयोग लागू झाला असून, त्याचे स्वरूप बदलत ग्रामपंचायतींना ८० टक्के तर जिल्हा परिषद व पंचायत समितीला प्रत्येकी दहा टक्के निधी देण्याचा निर्णय झाल्याने या दोन्ही संस्थांच्या सदस्यांतून बदलाचे स्वागत होत आहे.

नव्या निकषाने जिल्ह्यासाठी ८२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा परिषदेसाठी देण्यात आलेला १० टक्के निधी स्वत:कडे ठेवून उर्वरित निधी पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या खात्यावर तातडीने वर्ग करण्यात येणार आहे. त्यानंतर याबाबतचे प्रमाणपत्र झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शासनास सादर करणार आहेत. ग्रामपंचायत स्तरावरील निधीच्या वितरणाचे नियोजन, संनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांची राहील.

केंद्र शासनाकडून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी राज्याला बेसिक ग्रँट (अनटाइड) व टाइड ग्रँट अशा दोन प्रकारच्या ग्रँटच्या स्वरूपात निधी प्राप्त होणार आहे. हा निधी दिलेल्या सूचनांनुसार राष्ट्रीयीकृत बँकेच्या स्वतंत्र बचत खात्यात ठेवावा. ग्रामपंचायतीच्या विकास आराखड्यानुसार कामे व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार गावाच्या गरजा ओळखून आराखड्यानुसार कामे ठरविण्याचा अधिकार ग्रामसभा व ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे.

असा मिळेल निधी
एकूण ग्रामपंचायत १३८५
जिल्ह्यासाठी निधी ८२ कोटी
जिल्हा परिषदेला निधी ८ कोटी २० लाख
पंचायत समितीला निधी ८ कोटी २० लाख
ग्रामपंचायतीसाठी निधी ६५ कोटी ६३ लाख
राज्यासाठी प्राप्त निधी १४५६ कोटी

वित्त आयोगाच्या निधीत सदस्यांना यापूर्वी निधी मिळत नसल्याने गटातील विकासकामांना अपेक्षित न्याय देता येत नव्हता. यापुढील काळात वित्त आयोगाच्या निधीतून गटातील विकासकामे करणे शक्य होणार असून, स्वागतार्ह निर्णय आहे. केंद्र शासनाचे जिल्हा परिषद सदस्यांच्या वतीने आभार.
- संजय बनकर, सभापती,
कृषी व पशुसंवर्धन समिती, जिल्हा परिषद, नाशिक

निधीचा हा पहिला हप्ता असून, या वर्षीचा दुसरा हप्ता मिळेल. ग्रामपंचायत आराखड्यानुसार हा निधी खर्च करता येईल. यातील ५० टक्के निधी पाणीपुरवठा व स्वच्छतेवर खर्च करावा लागेल. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना ९० टक्के लोकसंख्या व १० भौगोलिक क्षेत्रानुसार समान निधी वाटप केले जाईल.
- रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, नाशिक


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...