वर्धा जिल्ह्यात ८० टक्‍के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

कर्जमाफी योजना
कर्जमाफी योजना

वर्धा ः राज्य शासनाने दीड वर्षापूर्वी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा केवळ १५ हजार ३५६ शेतकऱ्यांनाच लाभ झाला आहे. ही संख्या जेमतेम २० टक्‍के असून एकूण कर्जमाफीच्या ८० टक्‍के शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची वाट बिकटच ठरली आहे.  कर्जमाफीच्या लाभासाठी शासनाकडून विविध निकष लादण्यात आले होते. त्यामध्ये कर्जमाफीच्या मर्यादेनंतर उरणारी कर्जाची मोठी रक्‍कम एकमुस्त भरण्याची अट आणि दुसरे म्हणजे केवळ दीड लाखापर्यंतची कर्जमाफी. परंतु शेतकऱ्यांकडे एकमुस्त रक्‍कम भरण्यासाठी पैसे असते, तर त्यांनी थकीत कर्ज ठेवलेच का असते ? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. त्यासोबतच आणखी काही वर्षांनी सरकारकडून कर्जमाफी मिळेल. त्यामुळे कर्ज भरण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली.  ग्रामीण भागातील परिस्थिती, उत्पादनातील घट, शेतमालाला कमी मिळणारा दर हेदेखील कारणे त्यामागे आहेत. जुन्या पीककर्जधारकांची संख्या सहा हजार ४०४ असून, त्यांना ५२ कोटी ९८ लाख ३० हजार रुपयांची कर्जमाफी देण्याचे जाहीर करण्यात आले होत. जे शेतकरी नियमीतपणे कर्जाचा भरणार करतात, अशा सहा हजार ६२६ शेतकऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये याप्रमाणे १३ कोटी ७१ लाख ६ हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी देण्यात येणार होता. नियमित कर्जधारक ६४ हजार ७२१ शेतकऱ्यांपैकी ११ हजार ७०७ शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळविता आला आहे. ही टक्‍केवारी अवघी १७.०५ एवढीच आहे. या श्रेणीतील शेतकऱ्यांना ११८ कोटी १७ लाख १५ हजार कोटींची कर्जमाफी मिळाली आहे. जुन्या कर्जधारकांची संख्या ६ हजार ४०४ असून, यापैकी ८४१ शेतकऱ्यांनाच सात कोटी ६४  लाख ७७ हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. नियमितपणे कर्जाचा भरणा करणाऱ्यांपैकी २ हजार ८०८ शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांपर्यंतचाच प्रोत्साहन निधी देण्यात आला. सर्व श्रेणीतील एकूण १५ हजार ३५६ शेतकऱ्यांनाच कर्जमाफीची मिळाली असून, त्याकरिता शासनाकडून १८४ कोटी ६४ लाख ७२ हजार रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. तीन हजार ८१८ शेतकरी अद्यापही प्रोत्साहन निधीपासून वंचित आहेत.  ६४ हजारांवर शेतकरी जिल्ह्यात कर्जमाफीच्या घोषणेनंतर प्रशासनाच्या वतीने नियमित पीककर्जधारक शेतकऱ्यांची संख्या ६४ हजार ७२१ (दीड लाखाच्या आतील व वरील कर्जधारक) असल्याचे कळविण्यात आले होते. या शेतकऱ्यांकरिता ३८१ कोटी ३६ लाख २३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com