agriculture news in Marathi, 80 percent subsidy for micro irrigation in drought and farmers suicide affected districts, Maharashtra | Agrowon

अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत सूक्ष्म सिंचनासाठी ८० टक्के अनुदान
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त; तसेच नक्षलग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. यामुळे उपरोक्त प्रकारच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी ८० टक्के अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय शेततळ्यात अस्तरीकरण, हरितगृह उभारणी शेडनेट या घटकांसाठी अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त; तसेच नक्षलग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. यामुळे उपरोक्त प्रकारच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी ८० टक्के अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय शेततळ्यात अस्तरीकरण, हरितगृह उभारणी शेडनेट या घटकांसाठी अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेची अवर्षणप्रवण घोषित असलेले १४९ तालुके, अमरावती, औरंगाबाद या महसूल विभागातील सर्व जिल्हे; तसेच नागपूर विभागातील वर्धा असे १४ जिल्हे आणि केंद्र शासनाने नक्षलग्रस्त घोषित केलेल्या चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार आहे.

या नवीन योजनेसुनार आता वैयक्तिक शेततळ्यांच्या प्लॅस्टकि अस्तरीकरणासाठी खर्चाच्या ५० टक्के किंवा ७५ हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती मिळेल. ठिबक सिंचन, तुषार सिंचन संचासाठी अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदान मिळेल; तर इतर शेतकऱ्यांना (पाच हेक्टर मर्यादेत) ७५ टक्के अनुदान आता मिळू शकेल. हरितगृह उभारण्यासाठी (हजार चौरस मीटर) एक लाख; तसेच अनुदान एवढ्याच क्षेत्रफळावर शेडनेट उभारणीसाठी एक लाख रुपये अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.

या योजनेची अंमलबजावणी २०१९-२० पासून कृषी विभागामार्फत केली जाणार आहे. योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतील. मात्र, जोपर्यंत संगणकीय प्रणाली अस्तित्वात येत नाही तोपर्यंत नमुन्यातील अर्ज शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावे लागतील. प्राप्त होणाऱ्या अर्जांमधून उपलब्ध अनुदानाच्या मर्यादेत लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवड व पूर्वसंमतीची कार्यवाही होईल.

शेतकऱ्याने अनुदानासाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर १५ दिवसांच्या आत मोका तपासणी करून जिओ टॅगिंग करण्याचे बंधन राहणार आहे; तसेच मोका तपासणीनंतर अनुदान १५ दिवसांत लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे जमा केले जाईल. केंद्र किंवा राज्य शासनाच्या प्रचलित असलेल्या योजनांमधून लाभार्थ्याला कोणत्याही घटकाचा लाभ देण्यात आला असेल तर त्याला संबंधित घटकासाठी पाच वर्षे या योजनेअंतर्गत लाभ देऊ नये, अशा स्पष्ट सूचनाही करण्यात आल्या आहेत.

इतर अॅग्रो विशेष
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...
मज चंद्र हवास्थळ बंगळूर, सात सप्टेंबरची मध्यरात्र, वेळ १...
विविधतेतच एकताहिंदी भाषा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित...
एकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी...नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने...
पुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात...पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच...
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...
एकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...