Agriculture news in marathi, 80 percent useful water storage In the dams of Jalgaon | Page 2 ||| Agrowon

जळगावातील धरणांत ८० टक्के उपयुक्त पाणीसाठा

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021

जळगाव ः जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत लावलेल्या दमदार हजेरीने सिंचन प्रकल्पांत ७९.४० टक्के उपयुक्त जलसाठा झाला आहे. वाघूरसह अन्य मध्यम ८ प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. गिरणा प्रकल्पात ६८.४२ टक्के साठा आहे. 

जळगाव ः जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत लावलेल्या दमदार हजेरीने सिंचन प्रकल्पांत ७९.४० टक्के उपयुक्त जलसाठा झाला आहे. वाघूरसह अन्य मध्यम ८ प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. गिरणा प्रकल्पात ६८.४२ टक्के साठा आहे. 

जिल्ह्यात सप्टेंबरअखेर परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. मात्र अजूनही जिल्ह्यात काही दिवस काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाचा आहे. सुरुवातीला हवामान विभागाने सरासरीनुसार पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. जून- जुलैच्या सुरुवातीला मॉन्सूनने तब्बल १५ ते २० दिवसांचा खंड दिला. यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. सरासरी पर्जन्यमानानुसार जून ते सप्टेंबरदरम्यान आतापर्यंत १०४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक चांगली आहे. 

जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी हतनूर प्रकल्पात गेल्या २४ तासांत ५५.२१ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली. हतनूर प्रकल्पात ८०.५९ टक्के, तर गिरणा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात ९ मिलिमीटर पावसासह ३.१३ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली. प्रकल्पात ६८.४२ टक्के साठा आहे. वाघूर प्रकल्पासह अभोरा, मंगरूळ, सुकी, हिवरा, अग्नावती, तोंडापूर, बोरी आणि मन्याड आदी ९ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. मोर ९२.७४, बहुळा ९९.८, अंजनी ८७.५६, गुळ ४७.९७, तर सर्वांत कमी भोकरबारीत १६.८४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. 

‘गिरणा’तून वर्षभर पाणी 

जिल्ह्यातील अनेक तालुके व ग्रामीण पाणीयोजना सर्वांत मोठ्या गिरणा प्रकल्पावर अवलंबून आहेत. गिरणा प्रकल्प २००८ नंतर गेल्या दोन वर्षांपासून पूर्ण क्षमतेने भरत आहे. १७ सप्टेंबर २०१९ व १७ सप्टेंबर २०२० ला योगायोगाने गिरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. त्यानंतर पाच हजार क्युसेक व नंतर प्रकल्पात होणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ केली होती.

मात्र या वर्षी उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात गिरणा नदी पाणलोट क्षेत्रात अत्यंत कमी पर्जन्यमान झाले. त्यामुळे गिरणा प्रकल्प आणि या प्रकल्पांवरील चणकापूर ९७, अर्जुनसागरमध्ये ९७.७६ पाणीसाठा आहे. हरणबारी, केळझर, नागासाक्या या प्रकल्पांतून होणाऱ्या विसर्गामुळे सद्यःस्थितीत केवळ ६८.४२ टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा होण्यास मदत झाली आहे.


इतर बातम्या
सोलापूर : ऊसबिलासाठी महिन्यापासून सुरू...सोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री साखर...
गटशेतीद्वारे उत्पादनात वाढ होईल ः डॉ....रत्नागिरी ः ‘‘शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन, गट तयार...
जळगाव : करपात्र १५,१३३ लाभार्थी शेतकरी...जळगाव : शेतकऱ्यांना केंद्र शासनाव्दारे मदतीपोटी...
शेतकऱ्यांच्या आंदोलनाने अहंकारी सत्तेला...पुणे : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या...
अर्धापूर भागात केळीवर रोटावेटर; रोग,...नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर अंशत:...
लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकाऱ्यास...नाशिक : कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण...
कृषी सुधारणांचा अंत की पुनरुत्थान? :...केंद्र सरकारने पुन्हा एक समिती नेमून नव्याने...
शेतमजुरांना अपघात विम्याचे दोन लाखांचे...पुणे ः देशातील असंघटित कामगार व मजुरांना ई-...
पुढील लढाई तरुणांना लढावी लागेल : राकेश...केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द...
‘अन्न गुलामगिरी’ लादण्याचे षड्‌यंत्र :...केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेले तीन कृषी...
जळगाव जिल्ह्यात मतदारयाद्यांवर १५ हजार...जळगाव ः केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार...
विसापुरात ७४ वीजजोड तोडले; शेतकरी...विसापूर, जि. सांगली :  येथील ७४ शेतकऱ्यांचे...
कोदामेंढीत विषाणूजन्य रोगामुळे मिरची...कोदामेंढी, नागपूर  : वातावरणातील बदलामुळे...
बीडमध्ये किसान सभेने जाणल्या...बीडमध्ये : किसान सभेच्या ‘शेतकऱ्यांची दिवाळी...
वऱ्हाडात हरभऱ्याच्या लागवडीला आला वेगअकोला ः रब्बी हंगामासाठी पोषक परिस्‍थिती आहे....
शिरूर तालुक्यात वीजजोड तोडल्याने पिके...पुणे : महावितरणने वीजबिल वसुलीसाठी वीजजोड...
परभणी विभागात उन्हाळी हंगामात सोयाबीनचे...परभणी ः  ‘महाबीज’च्या परभणी विभागातील परभणी...
रत्नागिरीत अवकाळी पावसाने मोडले कंबरडेसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर...
परभणी जिल्ह्यात शेतीमाल तारणावर १ कोटी...परभणी ः ‘‘शेतीमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत...