agriculture news in marathi, 80% water stock in the dams of Satara | Agrowon

साताऱ्यातील धरणांत ८० टक्के पाणीसाठा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

सातारा ः जिल्ह्यातील उरमोडी व धोम-बलकवडी धरणांचा अपवाद वगळता, इतर प्रमुख धरणांत ८० टक्‍क्‍यांवर उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नसला, तरी धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणात पाणीस्थिती चांगली आहे.

सातारा ः जिल्ह्यातील उरमोडी व धोम-बलकवडी धरणांचा अपवाद वगळता, इतर प्रमुख धरणांत ८० टक्‍क्‍यांवर उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नसला, तरी धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणात पाणीस्थिती चांगली आहे.

जिल्ह्यात धरण क्षेत्रात दमदार झालेल्या पावसामुळे या वर्षी धरणे लवकर भरली होती. पाणीसाठा नियंत्रित राहावा यासाठी सर्वच धरणांतून कमी आधिक स्वरूपात पाणी सोडावे लागले होते. या पावसाळ्यात जुलै, ऑगस्टमध्ये जोरदार पाऊस झाल्याने या काळात सर्वाधिक पाणी धरणात जमा होते. वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. या वर्षी पाणीसाठा नियंत्रित राहण्यासाठी धरणातून अनेक वेळा पाणी सोडले होते. सध्या या धरणात ८५.६७ टक्के पाणीसाठा आहे. पाणीसाठा मुबलक असल्याने वीजनिर्मितीसह शेतीसाठी फायदेशीर ठरणार आहे. माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांच्या दुष्टीने महत्त्व असलेल्या उरमोडी धरणात ७९.६० टक्के पाणी उपलब्ध आहे.

प्रमुख धरणाच्या क्षेत्रात दमदार पाऊस झाला असला, तरी जिल्ह्याच्या इतर भागांत अपेक्षित पाऊस झालेला नाही. परिणामी खरिपातील पिकावर झाला. अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. पूर्वेकडील माण, खटाव, फलटण, खंडाळा तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी असल्याने आतापासून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. भविष्यात या तालुक्यात पाणीटंचाई होणार असल्याने आतापासून धरणातील पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...