सांगलीतून ८ हजार टन द्राक्षाची निर्यात

सांगली ः जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात सुरु आहे. आतापर्यंत ८ हजार टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. निर्यातक्षम द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.
8000 tons of grapes exported from Sangli
8000 tons of grapes exported from Sangli

सांगली ः जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात सुरु आहे. आतापर्यंत ८ हजार टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. निर्यातक्षम द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. दरम्यान, चीनने द्राक्ष आयातीबाबत दिलेल्या नियम-अटींचे शेतीमाल आणि प्रक्रियायुक्त पदार्थ निर्यात विकास एजन्सी (अपेडा) ने पालन केले नाही. त्यामुळे हंगाम मध्यापर्यंत आला तरी निर्यात होऊ शकली नव्हती. मात्र ही अडचण दूर झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सावळज (ता. तासगाव) येथून पहिला कंटेनर चीनला रवाना झाला आहे.

सन २०२० मध्येच चीनने द्राक्ष निर्यातीबाबत दिशानिर्देश दिले होते. द्राक्ष उत्पादक शेतकरी, शीतगृह आणि निर्यातदारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय-काय काळजी घेतली पाहिजे, या बाबत सविस्तर कळवले होते. केलेल्या उपाययोजनांचे चित्रीकरण करून ते चीनच्या संबंधित यंत्रणेला पाठवायचे होते. मात्र, ‘अपेडा’ने या बाबतची माहिती द्राक्ष बागायतदार संघ, निर्यातदारांना दिली नाही. 

चीनला निर्यात फायद्याची...

चीनला हिरव्या रंगाच्या लांब (सुपर, एसएस, अनुष्का आदी) मण्यांची आणि काळी (जम्बो) द्राक्षे निर्यात होतात. ही द्राक्षे युरोपला जात नाहीत. या द्राक्षांची निर्यात काही प्रमाणात रशियाला होते. यंदा युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाला होणाऱ्या निर्यातीला वेग आलेला नाही. चीनला लांब द्राक्षांची निर्यात होत असल्यामुळे या मालाचा उठाव होऊन देशांतर्गत बाजारपेठेत दर वधारत होता. मात्र, निर्यात बंद असल्याने यंदा लांब मण्यांच्या द्राक्षांचे दर प्रतिकिलो सुमारे दहा रुपयांनी पडले आहेत. चीनला करोना काळातही सरासरी २५०० टनांची निर्यात झाली होती. त्यातून शेतकऱ्यांना सुमारे ४० कोटी रुपये मिळाले होते. यंदा त्यात वाढ अपेक्षित होती. मात्र, अनागोंदी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला.

भारत-चीन दरम्यान चर्चेअंती सांगली जिल्ह्यातून पहिला टॅंकर रवाना होत आहे. हंगामाच्या सांगतेवेळी तरी द्राक्ष दरात सुधारणांची अपेक्षा आहे. मार्च महिन्यात निर्यात वेगाने होत असते. - पी. एस. नागरगोजे, शेतीमाल निर्यात सल्लागार, सांगली कृषी विभाग.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com