परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा परतावा मंजूर 

परभणी जिल्ह्यातील १ लाख ३७ हजार ६९८ शेतकऱ्यांना ८३ कोटी २५ लाख २८ हजार रुपये इतका विमा परतावा मंजूर करण्यात आला आहे.
परभणीतील शेतकऱ्यांना  ८३ कोटींचा विमा परतावा मंजूर 83 crore insurance refund sanctioned to farmers in Parbhani
परभणीतील शेतकऱ्यांना  ८३ कोटींचा विमा परतावा मंजूर 83 crore insurance refund sanctioned to farmers in Parbhani

परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन २०२०च्या खरीप हंगामात स्थानिक आपत्ती, काढणी पश्चात, मध्य हंगाम, पीक कापणी प्रयोग या पीक नुकसानीच्या निकषांच्या आधारे परभणी जिल्ह्यातील १ लाख ३७ हजार ६९८ शेतकऱ्यांना ८३ कोटी २५ लाख २८ हजार रुपये इतका विमा परतावा मंजूर करण्यात आला आहे. आजवर ५६ हजार २२२ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ३६ कोटी ८५ लाख ५५२ रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

२०२०च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ७ लाख १४४ विमा प्रस्तावाद्वारे ३ लाख ७६ हजार ८३ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले होते. त्यासाठी ३२ कोटी ८९ लाख ९४ हजार ९८३ रुपये विमा हप्ता भरला. विमा संरक्षित पिकांमध्ये २ लाख ४० हजार ३३ हेक्टरवरील सोयाबीन, २३ हजार ६६७ हेक्टरवरील कपाशी, ३९ हजार ५७२ हेक्टरवरील मूग, १५ हजार १६९ हेक्टरवरील उडीद, ४५ हजार ८१४ हेक्टरवरील तूर, ९ हजार ४०९ हेक्टरवरील ज्वारी, २ हजार ४१६ हेक्टरवरील बाजरी यांचा समावेश आहे. 

सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे नद्या, ओढ्यांच्या पुरामुळे पीकांचे नुकसान झाले. स्थानिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान अंतर्गंत शेतकऱ्यांनी कृषी विभाग तसेच विमा कंपनीकडे विमा दाव्यासाठी ४५ हजार ४०० तक्रारी दाखल केल्या होत्या. सर्वेक्षणानंतर १२ हजार १७ शेतकऱ्यांचे दावे अपात्र ठरले. काढणी पश्चात नुकसानीचे २ हजार ७२२ शेतकऱ्यांचे दावे अपात्र ठरले. स्थानिक आपत्ती नुकसान दाव्या अंतर्गंत आजवर ३१ हजार ३३८ लाभार्थीच्या खात्यावर २५ कोटी ९९ लाख १९ हजार रुपये तर काढणी पश्चात नुकसान दाव्या अंतर्गंत ५ हजार २६३ लाभार्थींच्या खात्यावर ६ कोटी ७० लाख ७० हजार रुपये जमा करण्यात आले.

मध्य हंगाम नुकसान दाव्या अंतर्गंत १९ हजार ६२१ लाभार्थींना ४ कोटी १५ लाख ६३ हजार रुपये वितरित करण्यात आले. पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षाआधारे आढळून आलेल्या उत्पादनातील घटी बद्दल ६९ हजार ५४६ शेतकऱ्यांना ४४ कोटी ९५ लाख ६० हजार रुपये एवढा विमा परतावा मंजूर करण्यात आला आहे. परंतु परताव्याची रक्कम अद्याप जमा करण्यात आलेली नाही. 

पीकविमा परतावा मंजूर स्थिती  नुकसान निकष प्रकार...लाभार्थी संख्या...परतावा रक्कम (कोटी रुपये) 

  • स्थानिक आपत्ती...३३३८३...२६.११ 
  • काढणी पश्चात...६९०८...७.४६ 
  • मध्य हंगाम...२७९५१...४.७१ 
  • पीक कापणी प्रयोग...६९४५६...४४.९५   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com