लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत उरकली ८३ टक्‍के पेरणी

83 percent sown in 5 districts of Latur Agriculture Department
83 percent sown in 5 districts of Latur Agriculture Department

लातूर : लातूर कृषी विभागातील पाचही जिल्ह्यांत यंदा सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८३ टक्‍के पेरणी उरकली आहे. लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत अधिक पेरणी झाली आहे. हरभऱ्याला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. शेतकऱ्यांनी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत दीडपट क्षेत्रावर त्याची पेरणी केली आहे. 

लातूर कृषी विभागात हिंगोली जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ४९ हजार ५८५ हेक्‍टर क्षेत्र आहे. त्या तुलनेत १ लाख ४ हजार १३१  हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. परभणी जिल्ह्यात सर्वसाधारण ३ लाख १ हजार ४३१ हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ७२ हजार १०० हेक्‍टरवर, तर नांदेड जिल्ह्यात सर्वसाधारण १ लाख ३६ हजार ५५५ हेक्‍टरच्या तुलनेत १ लाख १४३ हजार ९६४ हेक्‍टरवर, उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वसाधारण ३ लाख ३१ हजार ४९६ हेक्‍टरच्या  तुलनेत २ लाख ७६ हजार ६२१ हेक्‍टरवर, लातूर जिल्ह्यात सर्वसाधारण १ लाख ९५ हजार १६३ हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत २ लाख २६ हजार ७२९ हेक्‍टरवर सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. 

पाच लाख ५८ हजार हेक्‍टरवर हरभरा

लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यांत सर्वसाधारण ३ लाख ६५ हजार हेक्‍टरच्या तुलेनत ५ लाख ५८ हजार हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ २ ला ७७ हजार ८३५ हेक्‍टरवर रब्बी ज्वारी, ६१ हजार ७१२ हेक्‍टरवर गहू, ६८९८ हेक्‍टरवर मका, १४ हजार ६३१ हेक्‍टरवर करडईची पेरणी झाली. 

खरिपातील तूर, कपाशी अंतिम टप्प्यात

लातूर कृषी विभागातील पाचही जिल्ह्यांत कपाशी व तूर ही पिके अंतिम टप्प्यात आहेत. कपाशीची काही ठिकाणी अंतिम वेचणी सुरू आहे. काही ठिकाणी ती आटोपली आहे. तुरीचे पीक काही ठिकाणी शेंगा पक्‍वतेच्या अवस्थेत, तर काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे, कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com