सांगली जिल्ह्यात ८३ टक्के पेरणी

सांगली जिल्ह्यात ८३ टक्के पेरणी
सांगली जिल्ह्यात ८३ टक्के पेरणी

सांगली : गेल्या आठवड्यात पावसाची रिमझिम सुरू राहिल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील ८३ टक्के पेरणी झाली. जिल्ह्यात खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र २ लाख ७७ हजार ६८६ हेक्टर आहे. त्यापैकी २ लाख ३० हजार ४२१ हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती मिळाली. 

मिरज तालुक्यात सरासरी १६ हजार ८६५ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ११ हजार ६४३ हेक्टर पेरणी झाली. वास्तविक पाहता पावसाच्या भरवशावर पेरण्या झाल्या. तरीही पावसाचे सातत्य नसल्याने पेरणी केलेल्या पिकांची उगवण पुरेशी नाही. यंदा पाऊस लांबल्याने पेरण्यांना उशीर झाला. तरीही जूनअखेर झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याचे धाडस केले. त्यानंतर पावसाची उघडझाप सुरू होती. गेल्या चार दिवसांपूर्वी जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाच्या हलक्या मध्यम सरी कोसळल्या. त्यामुळे अगोदर पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली. तर ज्या ठिकाणी पेरणी थांबली होती, त्या भागात शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास प्रारंभ केला. 

जिल्ह्यात प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, सोयाबीन, नाचणी, मका, भात, सूर्यफूल भुईमूग ही पिके घेतली जातात. मिरज तालुक्यात सर्वांत कमी ३२ टक्के पेरणी झाली. 

तुरीचे क्षेत्र घटण्याची शक्यता

दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यांत तुरीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. गेल्या वर्षी ते अंदाजे ७ हजार ५०० हेक्टर होते. मात्र, यंदा पाऊस वेळेत न झाल्याने जिल्ह्यात ५ हजार ०९७  हेक्टरवर तुरीची पेरणी झाली. त्यामुळे यंदा तिचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. 

पीक    क्षेत्र (हेक्टरमध्ये)

भात १६ हजार ५७४ 
बाजरी ४७ हजार ७०७
मका २९ हजार ४११
तूर ५ हजार ०९७
मूग ५ हजार ६८९
उडीद ८ हजार ७२९
भुईमूग २६ हजार ४००
सोयाबीन ३८ हजार ५०६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com