Agriculture news in marathi 83,000 hectares of crops damaged due to heavy rains in Nashik division | Agrowon

नाशिक विभागात अतिवृष्टीमुळे ८३ हजार हेक्टर पिके खराब

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

नाशिक : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.

नाशिक : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. नाशिक विभागात एकूण ५ जिल्ह्यामधील ३४ तालुक्यांमध्ये काढणीस आलेल्या खरीप पिकांसह, भाजीपाला व फळ पिकांचे ८३ हजार ६७५ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. 

विभागात सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झाले आहे. खरीप पिकांसह बागायती पिके व बहुवार्षिक फळे, पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचे समोर आले आहे. यामध्ये भात, मका, ज्वारी, कापूस, तूर, सोयाबीन भुईमूग, उडीद, बाजरी, कांदा, कांदा रोपे, टोमॅटो, ऊस, केळी, भाजीपाला, डाळिंब, द्राक्ष या पिकांचे नुकसान झाले आहे.

यानंतर नुकसान नगर जिल्ह्यात ११ तालुक्यांमध्ये झाले आहे. यामध्ये मका, ज्वारी, कापूस, तूर, सोयाबीन, भुईमूग, उडीद, बाजरी, उडीद, मूग व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. धुळे जिल्ह्यात ४ तालुक्यांत पिकांना फटका बसला आहे.

मका, ज्वारी, कापूस, तूर, सोयाबीन, भुईमूग, उडीद, बाजरी, मूग व भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यात मका, ज्वारी, कापूस, तूर, ऊस सोयाबीन, मिरची, उडीद, मूग व भात ही पिके तडाख्यात सापडली आहेत. जळगाव जिल्ह्यात मका, ज्वारी, कापूस, तूर, सोयाबीन, भुईमूग, उडीद, बाजरी, ऊस, केळी, पपई, लिंबू यासह इतर फळबागांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.

शेतीकामे अडचणीत

कृषी विभागाने प्राथमिक नुकसानीचा अहवाल सादर केला असला, तरी अद्याप अनेक ठिकाणी शेतकरी पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून आहे. शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये बाजरी, मका, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांसह भाजीपाला पिकांचा समावेश आहे. सोंगणी करणे अडचणीचे  ठरत आहे. अनेक शेते उपळली आहेत. त्यामुळे हंगामातील काढणीचे नियोजन पुरते कोलमडले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांनी केळी पीकविमा भरू नयेजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
सांगलीत रब्बीचा ३९ हजार हेक्टरवर पेरासांगली ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी...
मराठवाड्यात नुकसान भरपाईसाठी १७३४...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यातील पिकांच्या नुकसान...
रत्नागिरीतील पीक नुकसानीची भरपाई मिळेल...चिपळूण, जि. रत्नागिरी ः चिपळूण तालुक्यात मागील...
शितादही करण्यापुरताही कापूस लागला नाहीअकोला ः शेतकऱ्याने कपाशीची लागवड केली. कपाशीची...
परभणी जिल्ह्यात पीकविमा परताव्यासाठी ३१...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...
सीताफळ प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन...अकोला ः गेल्या काही वर्षात सीताफळ लागवडीकडे...
नगरमधील ६० गावांतील ७८ पाणी नमुने दूषितनगर ः जिल्ह्यातील १४ तालुक्‍यांतील सप्टेंबर...
पुणे कृषी महाविद्यालयात आंदोलनपुणे ः सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी महात्मा...
गोंदिया जिल्ह्यातील दोन संस्थांचा धान...गोंदिया : नियमबाह्यरीत्या धान खरेदी तसेच...
हिंगोली जिल्ह्यात तीन लाख ७ हजार...हिंगोली : जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीमुळे...
उत्पादन खर्चाच्या दुप्पट दराचे काय? ः...नाशिक : ‘‘केंद्र सरकारने कांदा...
सोलापूर जिल्ह्यात पावणे दोन लाख हेक्‍टर...सोलापूर : अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात...
सोलापुरात महावितरण मुख्यालयाला ‘...सोलापूर : लॉकडाऊन काळातील शेतीचे संपूर्ण वीज बिल...
सोलापूर जिल्ह्यात तीस हजार शेतीपंपाच्या...सोलापूर :  अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे...
सेंद्रीय आणि शाश्‍वत शेती विकासासाठी ‘...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...
कांदाप्रश्नी केंद्राकडे पाठपुरावा करू:...नाशिक: कांदा साठवणूक मर्यादा निर्णयाच्या संदर्भात...
डाळिंबातील बुरशीजन्य मर रोगाचे...फळ तोडणीनंतर ताणावर असताना किंवा पिकाच्या...
केळी पिकावरील मर रोगाचे व्यवस्थापनझाडावरील जुन्या पानांच्या देठाकडील तळभागी फिकट...
सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्यसूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात मातीतून आणि...