agriculture news in Marathi 84 crore subsidy stuck of Shettale Maharashtra | Agrowon

‘मागेल त्याला शेततळे’च्या ८४ कोटी अनुदानाची प्रतीक्षा 

सुर्यकांत नेटके
सोमवार, 8 मार्च 2021

कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची कामे बंदच आहेत. मात्र अगोदर मंजुरीनंतर कामे करणाऱ्या राज्यातील १३ हजार २७१ शेतकऱ्यांना अनुदानापोटी ८४ कोटी १४ लाख रुपयांची प्रतीक्षा आहे.

नगर ः कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची कामे बंदच आहेत. मात्र अगोदर मंजुरीनंतर कामे करणाऱ्या राज्यातील १३ हजार २७१ शेतकऱ्यांना अनुदानापोटी ८४ कोटी १४ लाख रुपयांची प्रतीक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा निधी राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून दोन महिन्यांपूर्वी निधी मंजूर झालेला आहे. मात्र वितरणाबाबत आदेश निघाला नसल्याने निधी गुंतला असल्याचे सांगण्यात आले. 

शेतकऱ्यांनी कमी पाण्यात चांगले उत्पन्न घ्यावे यासाठी शासनाच्या कृषी विभागाने सुरू केलेली मागेल त्याला शेततळे योजना दुष्काळी भागासाठी अत्यंत लाभदायक ठरली असल्याचा अनुभव आहे. एका शेतकऱ्याला शासन जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये अनुदान देते. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे मागेल त्याला शेततळे ही योजना शासनाने स्थगित केली आहे. मात्र त्याआधी मंजुरी देऊन कार्यारंभ आदेश दिले नंतर ती शेततळी शेतकरी शेतकऱ्यांनी पूर्ण केली. मात्र त्याचे अनुदान अजूनही मिळालेले नाही. 

२०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षांत राज्यामध्ये अनुदानापोटी ६३६ कोटी २७ लाख रुपये खर्च झाले आहेत. कृषी विभागाच्या जिल्हास्तरावरून आलेल्या अहवालानुसार १३ हजार २७१ शेतकऱ्यांना अनुदान व कंत्राटी कामगार मानधानापोटी ८४ कोटी १४ लाख रुपयांची २ जून २०२० रोजी कृषी आयुक्तालयातील अमृता संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन विभागाच्या संचालकांनी रोजगार हमी व जलसंधारण विभागाच्या सचिवांना पत्र देऊन मागणी केली होती. त्यानुसार १९ जानेवारी २०१९ ला निधी मंजूर झाल्याची माहिती आहे. मात्र आता त्याला दोन महिने उलटून गेले तरी निधी वितरणाबाबत अध्यादेश नसल्यामुळे हा निधी पडून आहे. 

शेततळ्यांचे काम पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा असलेल्यांत कोकण विभागात २३२, नाशिक विभागात ४६७, पुणे विभागात ५९३९, कोल्हापूर विभागात १२४३, औरंगाबाद विभागात २३९०, लातूर विभागात ८२३, अमरावती विभागात ३५५ व नागपूर विभागात १८२२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. नगर जिल्ह्यात २९९५ शेतकरी आहेत. शेततळ्यांचे अनुदान तातडीने शेतकऱ्यांना द्यावे याबाबत गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, तसेच जामखेड कर्जतचे आमदार रोहित पवार यांनीही वरिष्ठ पातळीवर मागणी केलेले आहे. 

शेततळ्यांची स्थिती 

  • उद्दिष्ट : १ लाख ९२ हजार ३११ 
  • पूर्ण काम केलेले शेतकरी : १ लाख ४७ हजार ४१३ 
  • अनुदान दिलेले शेतकरी ः १ लाख ३४ हजार १४२ 
  • अनुदान प्रलंबित शेतकरी ः १३ हजार २७१ 
  • आवश्यक अनुदान ः ६६ कोटी ३५ लाख. 
  • चालू व पूर्ण कामासाठी आवश्यक ः १६ कोटी 

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...
संत्रा प्रक्रियेतून शेतकरी कंपनीची...वरुड (जि. अमरावती) येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा...
तीन पूरक व्यवसायांचा शेतीला भक्कम आधारखरपुडी (ता.. जि.जालना ) येथील अल्पभूधारक शेतकरी...
कांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर...नाशिक : चालूवर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागील...
उपाशी पोटाला लॉकडाउन करता येत न्हाय...! रोपळे बुद्रुक, जि. सोलापूर : कोरोनाच लय भ्या...
कर्ज परतफेडीला मुदतवाढ मिळावी गोंदिया ः गेल्या हंगामात देण्यात आलेल्या...
परभणी, हिंगोलीत २० हजार क्विंटल हरभरा...परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
लासलगावला कांदा लिलावात सहभागी होण्यास...नाशिक : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या...
विदर्भात मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाची...पुणे : झारखंड ते उत्तर कर्नाटक, छत्तीसगड आणि...
हापूसचा दराचा गोडवा टिकून रत्नागिरी ः वातावरणातील अनियमितेचा परिणाम यंदा...
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर...
बाजार समित्या बंद ठेवू नका पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमाल वितरण सुरळीत...
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये...कोल्हापूर : पूर्वेकडील राज्यांनी वाहतूक खर्चात...
कमाल तापमान वाढण्यास सुरुवात पुणे : राज्याच्या अनेक भागांत आकाश कोरडे झाले आहे...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
देशात यंदा सर्वसाधारण पाऊस;...पुणे : देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस...