Agriculture news in marathi 85 Persons Home Quarantine free in Sindhudurg District : Manjulakshmi | Agrowon

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८५ व्यक्ती ‘होम क्वारंटाईन’मुक्त ः के. मंजुलक्ष्मी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 एप्रिल 2020

सिंधुदुर्ग : ‘‘‘होम क्वारंटाईन’ केलेल्या ८५ व्यक्तींचा २८ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला. त्यामुळे त्यांना ‘होम क्वारंटाईन’मुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, नव्याने पाठविलेले चारही नमुने निगेटिव्ह आले आहेत. सद्यःस्थितीत जिल्हा ‘कोरोना’मुक्त आहे.

सिंधुदुर्ग : ‘‘‘होम क्वारंटाईन’ केलेल्या ८५ व्यक्तींचा २८ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला. त्यामुळे त्यांना ‘होम क्वारंटाईन’मुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, नव्याने पाठविलेले चारही नमुने निगेटिव्ह आले आहेत. सद्यःस्थितीत जिल्हा ‘कोरोना’मुक्त आहे. तरीदेखील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे’’, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले. 

मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ‘‘आतापर्यंत जिल्ह्यातील २ हजार १९१ व्यक्तींची तपासणी आरोग्य विभागातर्फे करण्यात आली. जिल्हा रुग्णालयाने एकूण ६६ व्यक्तींचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविले होते. त्यांपैकी ६५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर, एक नमुना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्या रुग्णांचा नमुना देखील यापूर्वीच निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत जिल्हयात एकही ‘कोरोना’चा रूग्ण नाही.’’ 

जिल्ह्यातील ३५८ व्यक्तींना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर, ५३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरण कक्षांमध्ये आहेत. तर, १५ व्यक्ती विलगीकरण कक्षामध्ये आहेत. ८५ व्यक्तींचे १४ दिवस विलगीकरण कक्षामध्ये, तर १४ दिवस होम क्वारंटाईन असे २८ दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण झाले आहे. त्यांना क्वारंटाईन मुक्त करण्यात आले आहे. जिल्हा रूग्णालयाच्या विलगीकरण कक्षात आणखी २५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे खाटांची संख्या आता १०० झाली आहे’’, असेही मंजुलक्ष्मी म्हणाल्या. 

गेले पंधरा ते वीस दिवस प्रशासकीय यंत्रणेने रात्र-दिवस काम केले. त्याचप्रमाणे यापुढे देखील काम करावे. जिल्हा ‘कोरोना’पासून दूर राहावा, यासाठी जिल्हा प्रशासन अटोकाट प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील सर्व डॉक्टर, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, एएनएम व एमपीडबल्यू, जिल्हा रूग्णालयातील कोविड- १९ कक्षात काम करीत असलेले डॉक्टर, आरोग्य कर्मचारी हे स्वःताच्या जिवाची चिंता न करता काम करीत आहेत, त्याबद्दल मंजुलक्ष्मी यांनी त्यांचे विशेष आभार मानले. 

तपासणीसाठी पाठविलेले नमुने ६६
निगेटिव्ह अहवाल ६५
पॉझिटिव्ह नमुने
घरीच विलगीकरण संख्या ३५८
संस्थात्मक विलगीकरण ५३
सद्यःस्थितीत पॉझिटिव्ह नमुने ००
विलगीकरण कक्षात दाखल १५

 


इतर ताज्या घडामोडी
संतुलित खत व्यवस्थापनावर द्या भरमाती परीक्षणानुसार जमिनीमध्ये उपलब्ध...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
सुधारित तंत्राने शेवगा लागवडशेवग्याची लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील...
वेलीचा वाढता जोम नियंत्रणात ठेवण्याकडे...द्राक्षबागेत गेल्या दोन दिवसापासून वातावरण...
कोरडवाहू शेतीसाठी आंतरपीक पद्धती...महाराष्ट्र राज्यात कोरडवाहू शेतीचे जवळपास ८५...
फळबागांमध्ये घ्या फुलांचे आंतरपीकफळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला...
मांडा ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रकआपल्या गावाचा ग्रामविकास आराखडा आपण सर्वांनी...
नाशिकमध्ये दोडका ३३३५ ते ४५८५ रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कापूस सल्ला कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल...
राज्यात टोमॅटो ५०० ते २५०० रूपये...सांगलीत १ हजार ते १२५० रूपये दर सांगली  ः...
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...