शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ सहभागी होणार

85 Swarajya Rath will be involved in the procession for Shiv Jayanti
85 Swarajya Rath will be involved in the procession for Shiv Jayanti

पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज सकाळी ९ वाजता लालमहाल येथून शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्याचे आयोजन केले आहे. सरसेनापती, सरदार, सुभेदार, स्वराज्यसेनानी, वीर मावळे आणि वीर मातांच्या तब्बल ८५ स्वराज्यरथांचा सहभाग या मिरवणुकीत आहे’’, अशी माहिती समितीचे संस्थापक अमित गायकवाड यांनी दिली.

सोहळ्याप्रसंगी संगीतकार अजय अतुल, महापौर मुरलीधर मोहळ, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेते चिन्मय मांडलेकर, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत.

समितीच्या जिजाऊ मॉसाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्यरथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, त्र्यंबकराव नाईक निवगुणे, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, सरनोबत सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, तोरणा किल्लेदार, गोदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे, श्रीमंत सरदार लखुजीराजे जाधवराव, प्रतापगड युद्धवीर सहसी सरदार रामजी पांगारे आदी स्वराज्यरथ गौरवशाली इतिहास मांडतील.

शिवकालीन युद्धकला सादर करणाऱ्या रणरागिणीचे शौर्य पथक युद्धकला सादर करणार आहेत. शिवगर्जना ढोलताशा पथक, रणशिंग, ओम नमो परिवर्तन महिला लेझीम पथक सहभागी होणार आहे. तर, सोहळ्यामध्ये वीर येसाजी कामठे यांच्या पुतळ्याचे आणि प्रतापगड युद्धवीर कृष्णाजी ऊर्फ रणबंकी गायकवाड यांच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे. एसएसपीएमएस शाळेतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर सकाळी ११ वाजता पुष्पवृष्टी होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com