सांगली जिल्ह्यात पीकविम्यापासून ८६ हजार शेतकरी दूर

सांगली जिल्ह्यात पीकविम्यापासून ८६ हजार शेतकरी दूर
सांगली जिल्ह्यात पीकविम्यापासून ८६ हजार शेतकरी दूर

सांगली : जिल्ह्यात ऑक्टोबरमधील पावसाने शेतकरी उद्‌ध्वस्त झाले आहेत. शासकीय आकडेवारीनुसार सुमार १ लाख ९७ हजार ७३८ शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. ९९ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विमा कंपन्यांच्या कारभाराने शेतकऱ्यांचा विम्यावर विश्वासच राहिला नाही. परिणामी, बाधित क्षेत्रात १ लाख ९७ हजारांपैकी तब्बल ८६ हजार शेतकरी विमा उतरविणे यांपासून दूर राहिले आहेत. 

पीकविम्यामधील निकषही शेतकऱ्यांना बाधक आहेत. त्याकडे पाठ फिरवली जात आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून संयुक्तपणे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हवामान आधारित फळ पीकविमा योजना सुरू करण्यात आली. दरवर्षी याबाबतचा शासननिर्णय काढण्यात येतो. यावर्षी देखील ३१ ऑक्टोबरला शासन आदेश काढून हवामानआधारित पीकविमा योजना जाहीर करण्यात आली. 

शासनाने या शासन निर्णयानुसार ८ नोव्हेंबर ते ३१ मार्च या कालवधीत अवकाळी पाऊस, तर १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत कमी तापमानामुळे झालेले नुकसान आणि १ जानेवारी ते ३० एप्रिल या कालावधीसाठी गारपीट नुकसानीसाठी तरतूद केली. अशा प्रकारे वर्षभर पिकासाठी काळजी घेण्याची गरज आणि विमा रक्कमही मोठी असाताना वर्षभरासाठी विमा संरक्षण दिले नाही. तारखांचा खेळ करून, कमीत कमी शेतकऱ्यांना विमा योजनांचा लाभ कसा मिळेल, यासाठीच सारा अट्टाहास केला जास असल्याचे दिसते. परिणामी, विमा कंपन्यांला कोट्यवधी रुपयांचा लाभ होतोय, तर शेतकरी पदरी काहीच मिळत नसल्याची स्थिती आहे.

याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदन देऊन पीकविम्याचे निकष बदलण्याची मागणी केली. तरीही बदल झाले नाहीत. परिणामी, जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यापैकी ३७ हजार ७१० शेतकरी विमा संरक्षित असून उर्वरित तब्बल ८६,६६६ शेतकऱ्यांचे विमा संरक्षण नाही. जिल्ह्यातील १० तालुक्यातील ६२७ बाधित गावांतील १ लाख ६९ हजार २४० शेतकऱ्यांचे ३ लाख ७७ हजार ११९ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ९९ हजार ६२०.७६  हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाले आहेत.

पीकविमा परिस्थिती

तालुका  बाधित शेतकरी विमा नसलेले शेतकरी
तासगाव ६८,७४२ ४८,३६५
क.महांकाळ १६,४२५ ७,७६३
खानापूर २१,७०४  १०,७०६
जत १५,२६२ ८,९२५
मिरज १०,३५४  ७,०३६
आटपाडी  १४,५८८ ५६६
पलूस ५,५५० ७०८
कडेगाव  ३८,४५५  ९५०
वाळवा  ६,६५८ १,६४७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com