agriculture news in Marathi 874 cooperative institutes elections pending due to corona Maharashtra | Agrowon

सांगलीतील ८७४ सहकारी संस्थांच्या निवडणूका लांबणीवर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 मे 2020

राज्य शासनाने निवडणुका तीन महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला असल्याने जिल्ह्यातील ८७४ सहकारी संस्थांच्या निवडणूका सप्टेंबरपर्यंत लांबणीवर गेल्या आहेत.

सांगली : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम सहकारी संस्थांच्या निवडणूकीवर झाला आहे. राज्य शासनाने निवडणुका तीन महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला असल्याने जिल्ह्यातील ८७४ सहकारी संस्थांच्या निवडणूका सप्टेंबरपर्यंत लांबणीवर गेल्या आहेत.

सांगली जिल्ह्यातील सहकारी संस्थांची संख्या ३ हजार ५९८ इतकी आहे. वर्षभरात एक हजार ४२९ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. त्यात अ व ब या मोठ्या वर्गातील व ज्यांचे कार्यक्षेत्र जिल्हाबाहेर विस्तारलेले आहे, अशा संस्थांचा समावेश आहेत. निवडणुका लांबणीवर गेलेल्या संस्थांमध्ये सोसायट्यांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजार समिती, नागरी बँकासह मोठ्या पतसंस्थांचाही यात समावेश आहे.

मार्च महिन्यात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसह सहकारी सोसायट्यांचा निवडणुकांची जोरदार तयारी सुरु झाली होती. त्याच दरम्यान, कोरोना विुषाणुचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने निवडणुका पुढील आदेश येईलपर्यंत थांबविण्याचे आदेश दिले होते. या परिपत्रकानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेसह, विविध कार्यकारी सहकारी सोसायची, नागरी बँका, पतसंस्थांच्या निवडणुका थांबल्या आहेत. आता शासनाचा निर्णय येत नाही तोपर्यंत निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.

संस्था संख्या
विकास सोसायट्या ३६१
औद्योगिक सहकारी संस्था १४
खरेदी-विक्री संघ
नागरी पतसंस्था
नागरी सहकारी बँका ११
पगारदार बँक
प्रक्रिया संस्था
मध्यवर्ती ग्राहक संस्था
सेवक पतसंस्था २५

वर्गनिहाय लांबणीवर गेलेल्या संस्था

अ वर्ग
ब वर्ग ४३१
क वर्ग २९०
ड वर्ग २४
एकूण ८४७

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...