यवतमाळमध्ये पाण्याचे ८७६ स्रोत दूषित 

यवतमाळ जिल्ह्यातील दहा हजार पाण्याच्या स्रोतांपैकी सहा हजार नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ५ हजार ७७१ स्रोत पिण्यायोग्य असून, तब्बल ८७६ स्रोत पिण्यायोग्य नसल्याची बाब समोर आली आहे.
यवतमाळमध्ये पाण्याचे ८७६ स्रोत दूषित  876 water sources contaminated in Yavatmal
यवतमाळमध्ये पाण्याचे ८७६ स्रोत दूषित  876 water sources contaminated in Yavatmal

यवतमाळ  : जिल्ह्यातील दहा हजार पाण्याच्या स्रोतांपैकी सहा हजार नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ५ हजार ७७१ स्रोत पिण्यायोग्य असून, तब्बल ८७६  स्रोत पिण्यायोग्य नसल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ६५४ स्रोत फ्लोराइडयुक्त आढळले आहेत, तर १२९ नमुने दीड टक्‍क्‍यांपेक्षा जास्त दूषित आहेत.  जिल्ह्यातील पाण्याच्या नमुन्यांची दोन टप्प्यांत तपासणी केली जाते. त्यात मॉन्सूनपूर्व व मॉन्सूननंतर पाणी नमुने घेतले जातात. स्त्रोतांनुसार विविध रंग देण्यात येतो.   जिल्ह्यातील बहुतांश स्रोतांमध्ये फ्लोराईड, नायट्रेट, फी, टर्ब आदी स्वरूपाचे प्रमाण आढळून येते. त्यामध्ये फ्लोराइड व नायट्रेटच्या स्रोतांचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते. त्यानुसार संबंधित स्रोतांवर उपाययोजना केल्या जातात. अन्यथा, पिण्याच्या पाण्याचे नियोजन वेगळ्या पद्धतीने करावे लागते. मॉन्सूनपूर्व तपासणीत जिल्ह्यातील १० हजार ६८९ पाण्याचे स्रोत आहेत. त्यातील ५ हजार ७७१ पाण्याचे स्रोत पिण्यायोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर त्यातील ८७६ पाण्याचे स्रोत पिण्यायोग्य नाहीत. विशेष म्हणजे यातील ६५४ स्रोतांमध्ये फ्लोराईडचे प्रमाण आढळून आले. तब्बल १२९ स्रोतांमध्ये दीड टक्‍क्‍यांपेक्षा अधिक फ्लोराइड असल्यामुळे अधिक धोका आहे. त्यात प्रामुख्याने नळयोजना, हातपंप, विहिरी आदी स्रोतांमध्ये फ्लोराइडचे प्रमाण असल्याचे आढळून आले आहे. फ्लोराइडचे पाणी पिल्यास विविध आजारांना सामोरे जाण्याची वेळ येते. गेल्या काही वर्षांमध्ये प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलली. परंतु उपाययोजना तोकड्या स्वरूपात असल्याचे स्पष्ट झाले.  जिल्ह्यातील २४५ स्रोतांमध्ये नायट्रेट  पाण्याच्या नमुन्यांमध्ये विविध प्रकारचे खनिज आढळून येत आहेत. त्यात फ्लाराइडसह आता नायट्रेटचे प्रमाणही स्रोतांमध्ये आढळून आले आहे. जिल्ह्यातील २४५ स्त्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण जून महिन्यात घेण्यात आलेल्या पाणी नमुने तपासणीत समोर आले आहेत. त्यात यवतमाळ तालुक्‍यात ८, बाभूळगाव ९, दारव्हा ४, नेर १३, आर्णी १३, पुसद ९, दिग्रस २, उमरखेड ४, महागाव ३, राळेगाव ८, कळंब ७, केळापूर ७३, घाटंजी ४०, वणी २७, मारेगाव ११, झरी जामणी १४, असे २४५ स्त्रोतांमध्ये नायट्रेट आढळून आलेले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com