agriculture news in marathi, 88 thousand children malnourished in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात ८८ हजार बालके कुपोषित
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

नाशिक : नाशिक जिल्ह्यात एकूण ८८ हजार २९१ बालके कुपोषित असल्याची बाब उजेडात आली असून, तरीही ग्राम बाल केंद्रे सुरू करण्यास चालढकल सुरू असल्याने खुद्द जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर यांना ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासमोर हतबलता व्यक्त करावी लागली. कुपोषणाचा वाढता आकडा आणि महिला व बालकल्याण विभागाची अनास्था या वेळी उघड झाली. तरीही कुपोषण निर्मूलनात जिल्हा राज्यात पहिला म्हणून डांगोरा पिटला जात आहे, हे विशेष!

नाशिक : नाशिक जिल्ह्यात एकूण ८८ हजार २९१ बालके कुपोषित असल्याची बाब उजेडात आली असून, तरीही ग्राम बाल केंद्रे सुरू करण्यास चालढकल सुरू असल्याने खुद्द जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर यांना ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासमोर हतबलता व्यक्त करावी लागली. कुपोषणाचा वाढता आकडा आणि महिला व बालकल्याण विभागाची अनास्था या वेळी उघड झाली. तरीही कुपोषण निर्मूलनात जिल्हा राज्यात पहिला म्हणून डांगोरा पिटला जात आहे, हे विशेष!

भुसे यांनी बुधवारी (ता.१९) जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतली. सर्वांसाठी घरे, शाळा, इमारती निर्लेखन आदी विषयांवर त्यात गांभीर्याने चर्चा करण्यात आली. कुपोषित बालकांबाबत मात्र हे गांभीर्य दाखविण्यात आले नसल्याची तक्रार खोसकर यांना करावी लागली.

तीव्र गंभीर कुपोषण श्रेणीत तब्बल २१ हजार ६९४ बालके, मध्यम तीव्र श्रेणीत ६६ हजार ५९७ बालके आहेत. आतापर्यंत हा आकडा सांगण्यात आला नाही. मंत्र्यांच्या बैठकीत तो समोर आला. पण, त्याबाबतही अजब स्पष्टीकरण देण्यात आले.

विभागीय महसूल आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त सुकदेव बनकर यांनी एवढा आकडा वाढला कसा, असा प्रश्‍न विचारला. त्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी तपासणी करण्याबाबत दिलेले प्रशिक्षण, कारवाई न करण्याचे आश्‍वासन यामुळेच खरी आकडेवारी बाहेर आल्याचे स्पष्टीकरण दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध झालेला निधी, त्यातून केलेल्या उपाययोजनांमुळे नऊ हजार बालकांची वजने वाढल्याचा दावा केला. त्यातून मुंडे यांची पाठराखणच करण्यात आली. विशेष म्हणजे मंत्र्यांनीही यावरच समाधान मानले.

दरम्यान, खोसकर यांनी ग्राम बालविकास केंद्रे बंद असल्याने या नऊ हजार बालकांची वजने पुन्हा घटत असल्याच्या तक्रारी पालक करीत असल्याचे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. तरीही मंत्र्यांना आपलेच म्हणणे पटवून देण्यात प्रशासन यशस्वी ठरले.

८० लाख रुपये पडून
ग्राम बालविकास केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी ८० लाख रुपये महिला व बालकल्याण विभागाकडे दोन महिन्यांपासून पडून आहेत. तरीही पंकजा मुंडे यांचा ग्राम बालविकास केंद्रांऐवजी बालउपचार केंद्र सुरू करण्याकडेच ओढा का आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

इतर बातम्या
कलिंगडांच्या जनुकीय प्रदेशांचा घेतला...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट कलिंगडाच्या सात...
औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा...औरंगाबाद : मक्याला किमान आधारभूत किंमत मिळावी,...
सांगली जिल्ह्यात यंदा पावसाची ‘रेकॉर्ड...सांगली : जिल्ह्यात गेल्या २० वर्षातील सर्वाधिक...
युरिया ब्रिकेटची पन्हाळा तालुक्यात शंभर...कोल्हापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
परभणीत साडेचार लाख हेक्टरवर पिके वायापरभणी : ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कमी...नांदेड : पावसामुळे नांदेड, परभणी, हिंगोली...
रत्नागिरी : गतवर्षीच्या तुलनेत भात...रत्नागिरी ः अतिवृष्टीमुळे कोकणातील शेतकरी चांगलाच...
शिरपूर उपबाजारात सोयाबीनची आवक वाढलीशिरपूर, जि. वाशीम  : सलग सुरू असलेला पाऊस...
करडा कृषी विज्ञान केंद्रात रब्बी कृषी...अकोला ः परतीच्या पावसाने खरीप पिकांचे अतोनात...
पणन संचालकपदी कोणाची वर्णी लागणार?पुणे ः शेतमाल विपणनच्या ३०७ बाजार समित्या, ९००...
धक्कादायक ! कांदा नुकसानीच्या...नाशिक  : चालू वर्षी दुष्काळामुळे होरपळून...
अमरावती : रब्बी हंगाम क्षेत्रात होणार...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पाऊस खरीप पिकांच्या मुळावर...
‘भातकुली’वर पाणीटंचाईचे सावटअमरावती  ः सुरुवातीला उघडीप त्यानंतर...
दक्षिण आफ्रिकेतील 'मालावी हापूस'...पुणे  ः दक्षिण आफ्रिकेतील मालावी प्रांतात...
पुणे विभागात रब्बीचा चार लाख हेक्टरवर...पुणे  ः ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत...
साताऱ्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून...सातारा ः अतिपावसाने शेती क्षेत्राचे कोट्यवधींचे...
पुणे बाजार समितीत ‘ई-नाम’ची अंमलबजावणी...पुणे :  शेतीमालाच्या ऑनलाइन लिलावांतून...
माण तालुक्यात पीक पंचनाम्यांमध्ये...दहिवडी, जि. सातारा  : पावसाने जोरदार तडाखा...
राज्यात अखेर राष्ट्रपती राजवटमुंबई ः चौदाव्या विधानसभेसाठी कोणत्याच...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस...कोल्हापूर  : यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीच्या...