Agriculture News in Marathi 89,000 hectares affected in Buldana | Agrowon

बुलडाण्यात ८९ हजार हेक्टर बाधित

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 ऑक्टोबर 2021

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीने सुमारे ८९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. १६ ते १८ ऑक्टोबर या काळात जिल्ह्यात प्रामुख्याने १९ मंडलांमध्ये अतिवृष्टी होऊन पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. 

बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीने सुमारे ८९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. १६ ते १८ ऑक्टोबर या काळात जिल्ह्यात प्रामुख्याने १९ मंडलांमध्ये अतिवृष्टी होऊन पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यातही मुख्यत्‍वे करून घाटावरील लोणार, मेहकर, सिंदखेडराजा या तालुक्यांमध्ये नुकसान झालेले आहे.

१६ ते १८ ऑक्टोबर असे सलग तीन दिवस पाऊस झाला. या पावसात सुमारे २२३ गावांतील शेतीला फटका बसला. यात मेहकर तालुक्यातील १३० गावांचा समावेश आहे. या तालुक्यात ४९ हजार ४११ हेक्टरवरील सोयाबीन, कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. लोणार तालुक्यात १७ हजार ४७७ तर सिंदखेडराजा तालुक्यात २२५०७ हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, तूर पिकाचे नुकसान झाले आहे.

तीन दिवसांतील या पावसात मेहकर, जानेफळ, हिवरा, डोणगाव, देऊळगाव, वरवंड, लोणी, अंजनी, सुलतानपूर, बिबी, हिरडव, अंजनी, साखरखेर्डा, शेंदुर्जन, किनगावराजा, उंद्री, मेरा आदी मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. सध्या जिल्ह्यात सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोंगणी केलेले तसेच सुडी लावून ठेवलेले सोयाबीनचे नुकसान झाले. सोयाबीनच्या शेंगामधून कोंब निघाले. कृषी, महसूल विभागाकडून संयुक्त पंचनामे झाल्यानंतरच या नुकसानाची अंतिम आकडेवारी मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात या खरीप हंगामात सातत्याने नुकसान झालेले आहे. पावसाच्या चारही महिन्यांत नुकसान झालेले असतानाच परतीच्या पावसानेही जोरदार तडाखा दिला आहे. नुकसान लक्षात घेता शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून मागणी केली जात आहे.

आधीची मदत केव्हा मिळणार
या हंगामात प्रत्येक महिन्यात पाऊस, पुराच्या पाण्याने पिकांचे नुकसान झालेले आहे. शासनाकडे याचे अहवालही सादर झालेले आहेत. परंतु संपूर्ण भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. संकटांची ही मालिका संपूर्ण खरीप हंगामात कायम होती. नुकसान भरपाई शासन, विमा कंपनी केव्हा देणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांकडून केला जात आहे.


इतर बातम्या
सोयापेंड आयातीचा प्रस्ताव नाहीपुणे ः पोल्ट्री उद्योगाने सोयापेंड आयातीसाठी...
सरसेनाध्यक्ष हेलिकॉप्टर अपघातामध्ये...नवी दिल्ली ः तमिळनाडूमध्ये लष्करी हेलिकाॅप्टरला...
सोयाबीन हेक्टरी पिकले बारा क्विंटल ३५...लातूर : पीक कापणी प्रयोगाअंती लातूर जिल्ह्यात...
‘पशुसंवर्धन’च्या लाभासाठी मराठवाड्यातून...औरंगाबाद : पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध लाभाच्या...
मंजूर रस्त्यांच्या कामांना ...अकोला ः जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून २५...
बंधारे ढीगभर, तरीही पाणीटंचाई शिगेला नागपूर : नरखेड तालुक्यात अनेक ठिकाणी छोटी-मोठी...
पीकविमा जाहीर झाला, पैसै कधी मिळणार? नगर ः नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी भरलेला गत वर्षीचा...
‘नाफेड’साठी खरेदी केलेला कांदा चाळीतच...नाशिक : केंद्राच्या भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत ‘...
सातारा जिल्ह्यात पावसाचा १५ हजार...सातारा : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या...
शेतकरी संघटनेचा ठिय्या;  ३५...अकोला ः पातूर तालुक्यातील सस्ती परिसरातील...
पीक आमचं, भावही आम्हीच निश्‍चित करू : ...कोंढाळी, जि. नागपूर : आता पीक आमचे आणि त्याचा...
पुणे जिल्हा बँकेसाठी १५९ अर्ज पात्रपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होत असतानाच,...
देशात नवा खत कायदा आणण्याच्या हालचालीपुणे ः देशासाठी स्वतंत्र खत कायदा तयार करण्याच्या...
शेवग्याला दराची झळाळीकोल्हापूर : राज्यात नुकत्याच झालेल्या...
पीक कापणी प्रयोग  ‘महाडीबीटी’वर कृषी...नागपूर : पीक कापणी प्रयोगाच्या तक्त्यांची संख्या...
बायो-सीएनजी गॅसवर ट्रॅक्टर चालविण्याचा...माळेगाव, जि. पुणे ः शेती आणि शेतीपूरक व्यवसाय...
बायोसिरप तंत्रामुळे इथेनॉल उद्योगाचे...पुणे ः उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करता येते;...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार...सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील चार नगरपंचायतींच्या...
नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना...नांदेड : जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना...