Agriculture News in Marathi 89,000 hectares affected in Buldana | Page 3 ||| Agrowon

बुलडाण्यात ८९ हजार हेक्टर बाधित

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 ऑक्टोबर 2021

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीने सुमारे ८९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. १६ ते १८ ऑक्टोबर या काळात जिल्ह्यात प्रामुख्याने १९ मंडलांमध्ये अतिवृष्टी होऊन पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. 

बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीने सुमारे ८९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. १६ ते १८ ऑक्टोबर या काळात जिल्ह्यात प्रामुख्याने १९ मंडलांमध्ये अतिवृष्टी होऊन पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यातही मुख्यत्‍वे करून घाटावरील लोणार, मेहकर, सिंदखेडराजा या तालुक्यांमध्ये नुकसान झालेले आहे.

१६ ते १८ ऑक्टोबर असे सलग तीन दिवस पाऊस झाला. या पावसात सुमारे २२३ गावांतील शेतीला फटका बसला. यात मेहकर तालुक्यातील १३० गावांचा समावेश आहे. या तालुक्यात ४९ हजार ४११ हेक्टरवरील सोयाबीन, कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. लोणार तालुक्यात १७ हजार ४७७ तर सिंदखेडराजा तालुक्यात २२५०७ हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, तूर पिकाचे नुकसान झाले आहे.

तीन दिवसांतील या पावसात मेहकर, जानेफळ, हिवरा, डोणगाव, देऊळगाव, वरवंड, लोणी, अंजनी, सुलतानपूर, बिबी, हिरडव, अंजनी, साखरखेर्डा, शेंदुर्जन, किनगावराजा, उंद्री, मेरा आदी मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. सध्या जिल्ह्यात सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोंगणी केलेले तसेच सुडी लावून ठेवलेले सोयाबीनचे नुकसान झाले. सोयाबीनच्या शेंगामधून कोंब निघाले. कृषी, महसूल विभागाकडून संयुक्त पंचनामे झाल्यानंतरच या नुकसानाची अंतिम आकडेवारी मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात या खरीप हंगामात सातत्याने नुकसान झालेले आहे. पावसाच्या चारही महिन्यांत नुकसान झालेले असतानाच परतीच्या पावसानेही जोरदार तडाखा दिला आहे. नुकसान लक्षात घेता शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून मागणी केली जात आहे.

आधीची मदत केव्हा मिळणार
या हंगामात प्रत्येक महिन्यात पाऊस, पुराच्या पाण्याने पिकांचे नुकसान झालेले आहे. शासनाकडे याचे अहवालही सादर झालेले आहेत. परंतु संपूर्ण भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. संकटांची ही मालिका संपूर्ण खरीप हंगामात कायम होती. नुकसान भरपाई शासन, विमा कंपनी केव्हा देणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांकडून केला जात आहे.


इतर बातम्या
माण तालुक्यात द्राक्ष शेतीचे पावसामुळे...कुकुडवाड, जि. सातारा : मागील आठवड्यात सलग आठवडाभर...
हापूस आंब्याचा हंगाम धोक्यातरत्नागिरी ः कोरोनातील बिकट परिस्थितीचा सामना करत...
‘इटियाडोह’च्या पाण्यासाठी बेमुदत...गोंदिया ः रब्बीत २४ किलोमीटरपर्यंत इटियाडोह...
काटेपूर्णा प्रकल्पावरून रब्बीसाठी पाणी...अकोला ः जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पातून या...
नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगाम धोक्यातनांदेड : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून सतत...
हर्षवर्धन पाटलांच्या धरणे आंदोलनाची...इंदापूर, जि. पुणे ः भाजप नेते हर्षवर्धन पाटील...
पुणे बाजार समितीत ‘डमी’ अडत्यांचा...पुणे ः बाजार समितीच्या मुळ उद्देशालाच हरताळ...
नगरमध्ये कोथिंबीर, मेथीची आवक वाढलीनगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
शासन व ग्रामपंचायतीच्या समन्वयातून...नाशिक: ग्रामीण भागात विविध योजना व संकल्पनांची...
ई- पीकपाहणीत जळगाव अव्वल ! जळगाव : राज्यातील पहिल्याच ई- पीकपाहणी प्रकल्पाचा...
कव्हेतील डाळिंब बागेची सोलापूर डाळिंब... सोलापूर ः माढा तालुक्यातील कव्हे (ता.माढा)...
 खानदेशात रब्बीची ४० टक्के पेरणी जळगाव ः  खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची...
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ...सोलापूर ः राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर २०२१ ते...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्याच्या किमान तापमानाचा पारा १५...
धुळीमुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’...गुमगाव, जि. नागपूर : कोतेवाडा, सोंडेपार शिवारातील...
तांदूळ महागणार ; अवकाळी पावसामुळे...नागपूर : नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे...
कामे पूर्ण केलेल्या शेतकरी गटांचे ...पुणेः समूह शेती योजनेत भाग घेतलेल्या शेतकरी...
अनुदान वितरणासाठीची नवी प्रणाली सर्वत्र...पुणे ः कृषी योजनांसाठी दिलेल्या निधीचा उपयोग...
 पन्नास एकरांवर शुगरबीट लागवड कोल्हापूर : महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्याला...
कांडली ग्रामपंचायतीची सौरऊर्जेतून...अमरावती ः अचलपूर पंचायत समितीअंतर्गत कांडली...