Agriculture news in marathi 895 farmers in Bhandara Application for micro irrigation canceled | Agrowon

भंडाऱ्यात ८९५ शेतकऱ्यांचे सूक्ष्म सिंचनासाठीचे अर्ज रद्द

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 जानेवारी 2021

 सूक्ष्म सिंचनाला जिल्ह्यात शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद आहे. १ हजार ४०३ शेतकऱ्यांकडून योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यात आले. मात्र विविध कारणांमुळे यातील ८९५ शेतकऱ्यांचे अर्ज बाद झाले असून, ४२४ शेतकऱ्यांनाच अनुदान मिळाले आहे. 

भंडारा : सूक्ष्म सिंचनाला जिल्ह्यात शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद आहे. १ हजार ४०३ शेतकऱ्यांकडून योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यात आले. मात्र विविध कारणांमुळे यातील ८९५ शेतकऱ्यांचे अर्ज बाद झाले असून, ४२४ शेतकऱ्यांनाच अनुदान मिळाले आहे. 

धानाचे कोठार, अशी ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात भाजीपाल्या खालील क्षेत्रातही नजीकच्या काळात वाढ नोंदविण्यात आली आहे. उपलब्ध पाण्याचा नियोजनबद्ध वापर करण्यासाठी सरसावलेल्या शेतकऱ्यांची सूक्ष्म सिंचनाला वाढती पसंती आहे. मात्र अनुदानासाठीच्या प्रस्तावात किरकोळ त्रुटी दाखवीत अर्ज बाद होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात १ हजार ४०३ शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन अनुदान योजनेसाठी अर्ज केले. त्यापैकी ८९५ अर्ज रद्द ठरविण्यात आले. 

अवघ्या ४२४ शेतकऱ्यांनाच अनुदानाचा लाभ देण्यात आला असून, १८१ शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. काही शेतकऱ्यांनी संच खरेदी केले नाहीत परिणामी त्यांचे अनुदान प्रस्ताव रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती कृषी खात्याच्या सूत्रांनी दिली आहे.

असे मिळते अनुदान
ठिबक आणि तुषार सिंचनासाठी शासनाकडून अल्प, अत्यल्प भूधारकांना ५५ टक्‍के तर पाच एकरपेक्षा अधिक शेती असणाऱ्यांना ४५ टक्‍के अनुदान दिले जाते. ठिबकसाठी एकरी ५० ते ६० हजार खर्च होऊन ३२ हजार तर तुषार सिंचनासाठी २० हजार रुपयांचा खर्च आणि अवघे ८ हजार रुपयांचे अनुदान मिळते. 

अशी आहे स्थिती     
एकूण प्रस्ताव    १४०३ 
अनुदान मंजूर    ४२४ 
प्रलंबीत शेतकरी    १८१ 
रद्द अर्ज    ८९५


इतर ताज्या घडामोडी
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...
खानदेशात वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे...जळगाव : खानदेशात कृषिपंपांची वीजबिल थकबाकी...
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...नांदेड : जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगाम २०२०-२१...
‘महाखनिज’मध्ये परराज्यांतील वाळूची...परभणी ः ‘‘राज्य शासनाने परराज्यांतून होणाऱ्या...
पुणे बाजार समितीत पायाभूत सुविधा द्या,...पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार विभागातील...
परभणी : संचालक मंडळाच्या निवडणूकीत...परभणी ः परभणी जिल्हा बॅंक संचालक मंडळाच्या...
सातारा जिल्हा बॅंकेसाठी दोन हजारांवर...सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीसह...
सात वर्षांत हमीभावात ऐतिहासिक वाढ ः...नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने...
सोलापुरात शेतकऱ्यांना थेट कर्जवाटप करणारसोलापूर : आर्थिक स्थितीमुळे गेल्या चार-पाच...
पणनची कापूस खरेदी रविवारपासून बंदनागपूर : बाजारात हमीभावापेक्षा कापसाला मिळणारा...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी...सोलापूर : सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या...
शेतीला दिवसा आठ तास वीजपुरवठा करा :...मुंबई : राज्यात वीजेचे दर कमी करण्याचे व...
मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च...मुंबई : ‘‘देशातील अनेक राज्यांमधून त्यांच्या...
शॉर्टसर्किटमुळे आग; अकराशे आंबा, काजू...रत्नागिरी : तालुक्यातील शीळ-सड्यावर वणव्याच्या...
घनकचरा पथदर्शी प्रकल्पांसाठी सिंधुदुर्ग...वैभववाडी : स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या...
अकोल्यात रब्बीसाठी ५४ कोटींचे पीककर्ज...अकोला : यंदाच्या रब्बी हंगमात जिल्ह्यात लागवड...
भाजपला दिला आयारामांनी झटका...सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महालिकेवर गेल्या अडीच...
तंत्र कोथिंबीर लागवडीचे...कोथिंबीर पिकास नियमित ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे...