विमा भरपाईपोटी केंद्राकडून ८९९ कोटी

पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र शासनाने विमा अनुदानाच्या पहिल्या हप्त्यापोटी ८९९ कोटी रुपये विमा कंपन्यांकडे अखेर वर्ग केले आहेत.
899 crore from the Center for insurance compensation
899 crore from the Center for insurance compensation

पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र शासनाने विमा अनुदानाच्या पहिल्या हप्त्यापोटी ८९९ कोटी रुपये विमा कंपन्यांकडे अखेर वर्ग केले आहेत. त्यामुळे काही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची दिवाळी गोड जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

खरीप २०२१ हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी राज्य शासनाने ९७३ कोटी रुपयांचा राज्य अनुदान हप्ता विमा कंपन्यांना दिलेला होता. मात्र पुढील प्रक्रिया रखडली होती. ही समस्या सोडविण्यासाठी कृषिमंत्री दादा भुसे यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. तसेच कृषी सचिव एकनाथ डवले आणि कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी आपापल्या पातळीवर गेल्या काही दिवसांपासून विविध यंत्रणांकडे पत्रव्यवहार केलेले आहेत. 

‘‘राज्य शासनाने स्वतःचा विमा अनुदान हिस्सा यापूर्वीच जमा केला होता. त्यानंतर कंपन्यांनी केंद्राकडे अनुदान मागणी करणे आवश्‍यक होते. त्यात दिरंगाई सुरू असल्याचे पाहून कृषी विभागाने कंपन्यांकडेही जोरदार पाठपुरावा केला. त्यामुळे केंद्राकडे कंपन्यांनी अखेर अनुदान मागणी नोंदविली. ही नोंदणी पूर्ण होताच केंद्रानेदेखील अनुदानहिस्सा वर्ग केला. परिणामी, पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यात विमा नुकसानभरपाईच्या रकमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे,’’ अशी माहिती राज्याचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी दिली. 

दरम्यान, राज्यभरात खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या पूर्वसूचनांची संख्या आता ३४.५२ लाख झाली आहे. यातील ८.०४ लाख शेतकऱ्यांच्या दाव्यांचे प्रस्ताव आतापर्यंत मान्य करण्यात आलेले आहे. या दाव्यांपोटी शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून किमान ४०३ कोटी रुपये पहिल्या टप्प्यात वाटले जाण्याची शक्यता आहे. याबाबत कृषी आयुक्तांनी याबाबत विमा कंपन्यांची बैठक बोलावून पुन्हा आढावा घेतला. दिरंगाई न करता शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाईचा लाभ देण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिलेल्या आहेत.

कोणत्या कंपनीला किती अनुदान हप्ता मिळाला (आकडे रुपयांमध्ये) रिलायन्स १६५.५८ कोटी  इफ्को १६१.९९ कोटी  एचडीएफसी ११६.२० कोटी  भारती एक्सा ९२.२४ कोटी  बजाज अलायन्स १०७.६२ कोटी  भारतीय कृषी विमा कंपनी २५४.९२ कोटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com