agriculture news in Marathi 9 lac houses will be build in rural area Maharashtra | Agrowon

ग्रामीण भागात नऊ लाख घरे बांधणार ः हसन मुश्रीफ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरकुले तसेच अद्याप मान्यता न दिलेल्या घरकुल प्रस्तावांना मान्यता देऊन येत्या १०० दिवसांत ८ लाख ८२ हजार १३५ घरकुले बांधून पूर्ण करण्यात येतील.

मुंबई : राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरकुले तसेच अद्याप मान्यता न दिलेल्या घरकुल प्रस्तावांना मान्यता देऊन येत्या १०० दिवसांत ८ लाख ८२ हजार १३५ घरकुले बांधून पूर्ण करण्यात येतील, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या विविध योजना गतिमान करून घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात २८ फेब्रुवारी २०२१  पर्यंत ‘‘महाआवास अभियान-ग्रामीण’’ राबविले जाणार असल्याचे मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. केंद्र आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण योजनांतर्गत राज्यास एकूण १६ लाख २५ हजार ६१५ इतके घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, त्यापैकी ११ लाख २१ हजार ७२९ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.

येत्या १०० दिवसांच्या अभियान कालावधीत उर्वरित ५ लाख ३ हजार ८८६ घरकुलांना मंजुरी देण्याचा मानस आहे. तसेच या लाभार्थ्यांना १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता म्हणून १५ हजार रुपये याप्रमाणे ७५० कोटी रुपये वितरित करण्यात येणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणार
घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा नसलेल्या राज्यातील सुमारे ७३ हजार लाभार्थ्यांची जागेची अडचण दूर करण्यासाठी अभियान कालावधीत विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी ५० हजारांपर्यंत अर्थसाह्य देण्यात येणार आहे. शासकीय जमीन विनामूल्य उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनासाठीची अतिक्रमणे नियमानुकूल करणे या उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली.

अभियानाची वैशिष्ट्ये

  • ग्रामीण भागात कामे वेळेवर आणि दर्जेदार होण्यासाठी ३३ हजार गवंड्यांना प्रशिक्षण तसेच साहित्य संच उपलब्ध करून देणार.
  • प्रत्येक पंचायत समितीच्या आवारामध्ये एक डेमो हाउसची निर्मिती करणार.
  • घरकुल लाभार्थ्यांना बँकेमार्फत ७० हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न.

इतर अॅग्रो विशेष
खानदेशात साठवणूकीअभावी कापूस खरेदीत...जळगाव : खानदेशात शासकीय खरेदीला जसा वेग आला, तशी...
मतदानातून लोकनियुक्त सरपंचावर अविश्‍वास...नगर ः थेट जनतेतून निवडलेल्या म्हैसगाव (ता. राहुरी...
संत्र्याची शेतातच लिलावाने विक्री;...परभणी ः जिल्ह्यातील ढेंगळी पिंपळगाव (ता. सेलू)...
नांदेडमध्ये ३४ लाखांचा शेतीमाल घेऊन...नांदेड : शेतीमालाला बाजारात जास्तीचा भाव देतो असे...
राज्यातील मातीत गंधक, जस्त, लोह,...अकोला ः हरितक्रांतीनंतर जास्त उत्पादन देणाऱ्या...
जमीन सुपीकता निर्देशांक आता एका क्लिकवरपुणे ः शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल अशी...
शेतकऱ्याची व्याख्या, वर्गीकरणाची गरज ः...पुणे ः शेतकऱ्यांच्या नावाखाली अनेक धनदांडगे...
टॉवरचा भुलभुलैया, लाखोंचा गंडाकऱ्हाड ः शेतात टॉवर बसवण्यासाठी संपर्क करा, अशा...
आज पुन्हा चर्चा; मंगळवारी भारत बंदनवी दिल्ली ः केंद्राचे तीनही कृषी कायदे...
बुरेवी चक्रीवादळ निवळू लागले; थंडी...पुणे ः बुरेवी चक्रीवादळ तमिळनाडू व आंध्र...
माती जीवंत ठेवाआज पाच डिसेंबर. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अन्न व...
‘आत्मनिर्भर’ : एक उलटा प्रवासनाणेनिधीच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या इकॉनॉमिक...
‘कल्पतरू’ चिक्कीची टेस्ट एकदम बेस्ट!औरंगाबाद जिल्ह्यात भटजी (ता. खुलताबाद) येथील राणी...
ज्वारी, हरभरा, गहू बियाण्यांचा ‘...शिवणी (जि. जळगाव) येथील पद्मालय शेतकरी उत्पादक...
चक्रीवादळांचा तडाखा यंदा वाढलापुणे : चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी...
साखरेची ‘एमएसपी’पेक्षा कमी किमतीने मागणीकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री...
काजू उत्पादकांना दिलासामुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील काजू...
का येताहेत चक्रीवादळे? भारताच्या पूर्व भागात असलेला बंगालचा उपसागर,...
कृषी कायद्यांविरोधात राज्यात...पुणे ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि पणन...
किसान समन्वय समितीचा अकोले येथे मोर्चा नगर ः केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना...