नांदेड जिल्ह्यात ९ लाख ४६ हजार पीकविमा प्रस्ताव

नांदेडः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ९ लाख ४६ हजार २३० ऑनलाइन पीकविमा प्रस्ताव सादर केले.
  9 lakh 46 thousand crop insurance proposal in Nanded district
9 lakh 46 thousand crop insurance proposal in Nanded district

नांदेड ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ९ लाख ४६ हजार २३० ऑनलाइन पीकविमा प्रस्ताव सादर केले. एकूण ४ लाख ९९ हजार ६५४ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी या पिकांचा पीकविमा योजनेत समावेश होता. जिल्ह्यात यंदाच्या खरिपात ७ लाख ५५ हजार १८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. एकूण ४४ कोटी रुपयावर विमा हप्ता भरुन ४ लाख ९९ हजार ६५४ हेक्टरवरील पिकांसाठी विमा कवच घेतले आहे. 

सुमारे अडीच लाख हेक्टरवरील पिके विमा संरक्षणाविना आहेत. विमा कंपनी तालुकानिहाय सहभागी शेतकरी संख्या, विमा संरक्षित क्षेत्र, बॅंकांकडे सादर केलेले प्रस्ताव आदी माहिती सादर केलेली नाही. बॅकांकडील माहिती संकलित झाल्यानंतर प्रस्तावांच्या संख्येत बदल होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com