agriculture news in marathi 90% banana harvesting completed in Khandesh | Agrowon

खानदेशात ९० टक्के केळीची काढणी पूर्ण

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 जानेवारी 2021

जळगाव ः खानदेशात कांदेबाग केळीची काढणी ९० टक्क्यांवर पूर्ण झाली आहे. उशिरा लागवडीच्या बागांमधील काढणी सुरू आहे.

जळगाव ः खानदेशात कांदेबाग केळीची काढणी ९० टक्क्यांवर पूर्ण झाली आहे. उशिरा लागवडीच्या बागांमधील काढणी सुरू आहे. ही काढणीदेखील येत्या १० ते १५ दिवसांत पूर्ण होईल. त्यामुळे केळीची आवकही मोठ्या प्रमाणात घटली आहे. 

कांदेबाग केळीची लागवड खानदेशात जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, पाचोरा-भडगाव, धुळ्यातील शिरपूर भागात अधिक होत असते. याच भागात गेल्या वर्षी  नोव्हेंबरअखेर अनेक बागांची लागवड झाली होती. ही लागवड उशिरा झाल्याने काढणी आतापर्यंत सुरू होती. ही काढणी पूर्ण होत आली आहे. कांदेबाग केळीचा काढणी हंगाम ऑक्टोबरमध्ये वेगात सुरू होते. डिसेंबरच्या मध्यात हा काढणी हंगाम पूर्ण होत असतो. 

यंदा काढणी सुमारे २० ते २५ दिवस लांबली. ही काढणी सध्या फक्त शिरपूर, चोपडा भागात सुरू आहे. ऑक्टोबरमध्ये कांदेबाग केळीची आवक बऱ्यापैकी होती. रोज १५५ ते १६० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) आवक होती. ती आता घटली आहे. 

दर सुधारण्याचे संकेत

रावेरात निर्यातक्षम केळीची काढणी सुरू होईल. या केळीची पाठवणूक विविध कंपन्यांच्या मदतीने आखातात व दिल्ली, पंजाब येथील मॉल्स, मोठ्या खरेदीदारांकडे होईल. यामुळे केळीच्या दरात सुधारणा होईल, असेही संकेत आहेत.

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा...अकोले, जि. नगर : पारंपरिक बियाण्यांची जोपासना...
ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर नाशिक : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड...
सोयाबीन विक्रमी टप्पा गाठेल कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे...
कृषी पंढरीतील यात्रेची उत्सुकता शिगेला माळेगाव, बारामती ः येथील कृषी पंढरीत आजपासून (ता....
‘पोकरा’ अनुदानातून अनेक घटक वगळले पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (...
कृषी आयुक्‍त थेट बांधावर औरंगाबाद : कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेट व आढावा...
ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पुणे ः मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
समविचारी शेतकऱ्यांचे राष्ट्रीय संघटन...नागपूर ः शेती प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...
बारामतीमध्ये उद्यापासून कृषी तंत्रज्ञान...माळेगाव, बारामती ः अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट...
कृषी अधिकारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात...पुणे ः सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर...
दर वाढूनही नुकसानीमुळे डाळिंब...सांगली ः देशातील मृग हंगामातील डाळिंब उत्पादन...
दुधाचा अभ्यास करा : केंद्र सरकारपुणे : गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाचे फायदे आणि इतर...
दहा हजार क्विंटल ज्वारीचा झाला भुस्साअकोला  ः  जिल्ह्यात २०१५ ते २०१७...
राज्यात विविध घटनांमध्ये वर्षभरात १७८...नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने...
‘सिल्क समग्र’ योजना सुरू ठेवण्यास...औरंगाबाद : तुती टसर रेशीम उद्योग विकासाठी...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
‘अपेडा’वरील नोंदणीत राज्याचा टक्का वाढलानागपूर ः निर्यातीला चालना मिळावी तसेच देशांतर्गत...
चिकन, अंडी खाण्यास पूर्णपणे सुरक्षित ः...पुणे ः पूर्णपणे उकडलेली अंडी आणि चिकन खाण्यासाठी...