agriculture news in marathi 90% banana harvesting completed in Khandesh | Page 2 ||| Agrowon

खानदेशात ९० टक्के केळीची काढणी पूर्ण

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 जानेवारी 2021

जळगाव ः खानदेशात कांदेबाग केळीची काढणी ९० टक्क्यांवर पूर्ण झाली आहे. उशिरा लागवडीच्या बागांमधील काढणी सुरू आहे.

जळगाव ः खानदेशात कांदेबाग केळीची काढणी ९० टक्क्यांवर पूर्ण झाली आहे. उशिरा लागवडीच्या बागांमधील काढणी सुरू आहे. ही काढणीदेखील येत्या १० ते १५ दिवसांत पूर्ण होईल. त्यामुळे केळीची आवकही मोठ्या प्रमाणात घटली आहे. 

कांदेबाग केळीची लागवड खानदेशात जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, पाचोरा-भडगाव, धुळ्यातील शिरपूर भागात अधिक होत असते. याच भागात गेल्या वर्षी  नोव्हेंबरअखेर अनेक बागांची लागवड झाली होती. ही लागवड उशिरा झाल्याने काढणी आतापर्यंत सुरू होती. ही काढणी पूर्ण होत आली आहे. कांदेबाग केळीचा काढणी हंगाम ऑक्टोबरमध्ये वेगात सुरू होते. डिसेंबरच्या मध्यात हा काढणी हंगाम पूर्ण होत असतो. 

यंदा काढणी सुमारे २० ते २५ दिवस लांबली. ही काढणी सध्या फक्त शिरपूर, चोपडा भागात सुरू आहे. ऑक्टोबरमध्ये कांदेबाग केळीची आवक बऱ्यापैकी होती. रोज १५५ ते १६० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) आवक होती. ती आता घटली आहे. 

दर सुधारण्याचे संकेत

रावेरात निर्यातक्षम केळीची काढणी सुरू होईल. या केळीची पाठवणूक विविध कंपन्यांच्या मदतीने आखातात व दिल्ली, पंजाब येथील मॉल्स, मोठ्या खरेदीदारांकडे होईल. यामुळे केळीच्या दरात सुधारणा होईल, असेही संकेत आहेत.


इतर बातम्या
पोलिस पाटलांना दरमहा १५ हजार मानधन द्यानाशिक : पोलिस पाटील पद शासन यंत्रणेतील गाव...
महिलांची शेतकरी कंपनीच्या माध्यमातून...पुणे ः महिला उत्पादक शेतकऱ्यांचे संघटन करून...
...त्या तिघींनी पापड उद्योगातून जपली...कोल्हापूर : ‘त्या‘ तिघी एकमेकाला सावरणाऱ्या....
कांदा चाळीचे अखेर मिळाले अनुदाननगर ः कृषी विभागाने पूर्वपरवानगी दिल्यानंतर २०१८-...
हरभऱ्‍याचा उतारा यंदा घसरला, एकरी ३ ते...सुलतानपूर, जि. बुलडाणा : यंदाच्या हंगामात चांगला...
मुलींनी सांभाळली वडिलांची शेती नांदेड : हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील गणेश...
‘समृद्धी’च्या सोबतीने बुलेट ट्रेन...अकोला : राज्यात साकारत असलेल्या नागपूर-मुंबई...
दीड एकरातील डाळिंबावर फिरवला नांगर रिसोड, जि. वाशीम : अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने...
हळदीला दराची झळाळी, उत्पादनातील घटीने...नागपूर : यंदा मागील दोन महिन्यांत हळदीच्या भावात...
अर्हता डावलून दिली जातेय कृषी विभागात... नागपूर : वर्ग चार ते कृषी सहाय्यक पदोन्नतीसाठी...
विदर्भात अवकाळीची शक्यता पुणे : दक्षिण आसामच्या परिसरात चक्रीय स्थिती तयार...
सरकारी आकड्यांपेक्षा हरभरा उत्पादनात घट यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच पिकांना बदलत्या...
म्हैसाळ योजनेचे पाणी तिसऱ्या टप्प्यात... सांगली : म्हैसाळ योजनेचे पंप धिम्या गतीने सुरू...
कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे ः डॉ....अंबाजोगाई, जि. बीड : नोकरीच्या मागे न लागता...
डीएड पदविका घेऊन शेतीत रमल्या दोघी जावाऔरंगाबाद : घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग समजदारीने...
संघर्षातून उभारली ‘तिने’शेतकरी उत्पादक...नाशिक : आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने...
उन्हाचा चटका वाढतोय पुणे ः राज्यात आकाश निरभ्र झाल्याने उन्हाचा चटका...
आता ‘बीडीओ’ देणार विहिरींना मंजुरी कऱ्हाड, जि. सातारा ः महात्मा गांधी राष्ट्रीय...
नगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी उदय...नगर : नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
नांदेडमध्ये थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना...नांदेडमध्ये : ‘‘कृषी पंपाच्या वीज थकबाकीतून...