agriculture news in Marathi, 90 crore rupees without spend of micro irrigation subsidy, Maharashtra | Agrowon

सूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चित
मारुती कंदले
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

मुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन अनुदानापैकी तब्बल ९० कोटी रुपये अद्यापही खर्च झालेले नाहीत. त्यासोबतच कृषी विभागाने पूर्वसंमती दिलेल्या ३९ हजार शेतकऱ्यांनाही अजून अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे कृषी खात्याच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

मुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन अनुदानापैकी तब्बल ९० कोटी रुपये अद्यापही खर्च झालेले नाहीत. त्यासोबतच कृषी विभागाने पूर्वसंमती दिलेल्या ३९ हजार शेतकऱ्यांनाही अजून अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे कृषी खात्याच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

राज्यात राबविण्यात येत असलेली सूक्ष्म सिंचन अनुदान योजना केंद्र सरकार पुरस्कृत आहे. गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारने अनुदानाच्या निकषात बदल केले आहेत. सध्या या योजनेसाठी केंद्राकडून साठ टक्के तर राज्याला चाळीस टक्के हिस्सा द्यावा लागतो. त्याआधी हे प्रमाण केंद्र ऐंशी : राज्य वीस असे होते. त्यानुसार, गेल्या वर्षासाठी केंद्राने राज्याला ३१५ कोटी रुपयांचे अनुदान दिले. तर राज्य हिस्स्याचे २५० कोटी असे मिळून ५६५ कोटी रुपये उपलब्ध होते. 

गेल्या दोन वर्षांपासून सूक्ष्म सिंचनासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जातात. साधारणतः प्रत्येक वर्षी मे महिन्यापासून राज्यात ही प्रक्रिया सुरू होते. दरवर्षी सरासरी अडीच लाख शेतकरी सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी अर्ज करीत असतात. कृषी खात्याची पूर्व सहमती मिळालेल्या शेतकऱ्यांनी साठ दिवसांत सूक्ष्म सिंचन संच बसवायचे आहेत. सुरवातीला शेतकरी संचाची संपूर्ण रक्कम स्वतः भरतात.

शेतकऱ्यांनी संच बसवल्याची मोका तपासणी झाल्यानंतर दहा दिवसांत तालुका कृषी अधिकाऱ्यांनी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायची आहे. शेतकरी २३ हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवत असतात. अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के तर मोठ्या शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान दिले जाते. अनुदानाची मर्यादा पाच हेक्टरपर्यंत आहे. एकदा अनुदान घेतल्यानंतर संबंधित क्षेत्रासाठी सात वर्षांत पुन्हा अनुदान मिळत नाही. 

मात्र, कृषी खात्यातील लालफितीच्या कारभारामुळे अनुदान वाटप संथगतीने चालते, हा प्रत्येक वर्षीचा अनुभव आहे. गेले आर्थिक वर्ष संपून चार महिने उलटले तरी तेव्हाच्या उपलब्ध निधीपैकी ९० कोटी रुपये अद्यापही खर्च झालेले नाहीत. गेल्या आर्थिक वर्षात १,६९,६५१ शेतकऱ्यांना ४२७ कोटी रुपये अनुदान वाटप झाले आहे. याद्वारे १,३१,१३२ हेक्टर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन संच बसवण्यात आल्याचे मंत्रालयातील कृषी विभागातून सांगण्यात आले. अद्यापही कृषी खात्याने पूर्वसंमती दिलेल्या ३९,९४६ शेतकऱ्यांना संच बसवूनही अनुदान मिळालेले नाही. एकीकडे सरकारी निधी खर्च होत नाही, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही, अशी विचित्र परिस्थिती आहे. ८ ऑगस्ट २०१८ अखेरपर्यंतची ही आकडेवारी आहे.

चालू वर्षासाठी आठशे कोटी
चालू वर्षासाठी या योजनेसाठी केंद्राने ४८० कोटी तर राज्य हिस्स्याचे ३०९ कोटी असे एकंदर सुमारे आठशे कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. योजनेअंतर्गत उपलब्ध निधी खर्च झाल्यास त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर केल्यानंतर केंद्र-राज्याचे पुढील अनुदान मिळत असते. मात्र, गेल्यावर्षातील निधी अद्यापही खर्च न झाल्याने नवीन निधी किती मिळणार, असा सवाल आहे. 

गेल्या तीन वर्षांतील अनुदान वाटपाची स्थिती (कोटींमध्ये)

वर्ष    वाटप     शेतकरी
२०१४-१५  १७७.५०    १,२२,४६९
२०१५-१६  २६५.३७   ४७,१०६
२०१६-१७ २४७.५० १,६२,४०२ 
२०१७-१८    ५६५ (उपलब्ध)     १,६९,६५१
(८-८-२०१८ अखेर)

    
    
        

 

इतर अॅग्रो विशेष
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...
थंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...