Agriculture news in Marathi 90 days survey to prevent bird flu | Page 3 ||| Agrowon

‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी ९० दिवस सर्वेक्षण करणार

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 जानेवारी 2021

दक्षतेच्या उपाययोजना अंतर्गत बर्ड फ्लू आढळून आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात ९० दिवसांच्या कालावधी पर्यंत सर्वेक्षण केले जाणार आहे. संबंधित कुक्कुटपालकांना पक्षाच्या नुकसानीबद्दल मावेजा देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

परभणी ः जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार आणि संसर्ग रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील गावांतील व्यक्तींना तूर्त  या आजाराचा संसर्ग झाल्याचे आढळून आलेले नाही. परंतु दक्षतेच्या उपाययोजना अंतर्गत बर्ड फ्लू आढळून आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात ९० दिवसांच्या कालावधी पर्यंत सर्वेक्षण केले जाणार आहे. संबंधित कुक्कुटपालकांना पक्षाच्या नुकसानीबद्दल मावेजा देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

जिल्ह्यातील मुरुंबा, कुपटा, पेडगाव या गावातील कोंबड्यांमध्ये आढळून आलेल्या बर्ड फ्लू या आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य संचालनालयाच्या सार्वजनिक आरोग्य सेवा समितीचे डॉ. सुनील खापर्डे, औषधशास्त्र विभागाचे डॉ. रोहित कुमार, पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतील डॉ. मनोहर चौधरी, डॉ. प्रदीप मुरमकर यांच्या पथकाने या गावांना भेटी देऊन बर्ड फ्लूच्या मानवी संसर्ग तसेच त्याअनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्यानंतर मंगळवारी (ता. १९) सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुगळीकर यांनी याबाबत माहिती दिली.

मुगळीकर म्हणाले, जिल्ह्यातील कुक्कुटपक्षी बर्ड फ्लू बाधित आल्याचे निष्षन्न झाल्यानंतर तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. प्रतिबंधित क्षेत्रातील कलिंग आॅपरेशनव्दारे या गावातील ४ हजार ५५ कुक्कुट पक्ष्यांची तसेच १ हजार ११५ अंडी, कुक्कुट खाद्य यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. कुक्कुट पक्ष्यांच्या संर्पकांतील व्यक्ती तसेच चिकन विक्रेत्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. बाधित कुक्कुट पालकांना मोठ्या पक्ष्यांसाठी प्रतिपक्षी ९० रुपये तर  छोट्या पक्ष्यांसाठी ४० रुपये प्रतिपक्षी मावेजा देण्यात आला आहे.

डॉ. खापर्डे म्हणाले की, बर्ड फ्लू प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्यामुळे या आजाराचा मानवी संसर्ग झाला नसल्याचे आढळून आले  आहे. दक्षता म्हणून संभाव्य रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र बेड, व्हेंटीलेटर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींची आरोग्य तपासणी केली जात आहे. पशुसर्वधन विभाग तसेच पशुवैद्यकीय महाविद्यालयातर्फे जनजागृती केली जात आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अशोक लोणे
उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची काढणी प्रत्येक भाजीपाला पिकाचा काढणी कालावधी हा...
पांडुरंग साखर कारखाना उताऱ्यात...सोलापूर : पांडुरंग साखर कारखान्याने २५ लाख ७७...
अकोला झेडपीच्या कृषी विभागाचे दहा...अकोला : जिल्हा परिषद कृषी विभागाला आगामी आर्थिक...
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा दोन हजार...नाशिक : जिल्ह्यात अवकाळी व गारपिटीमुळे झालेल्या...
कपाशीचा उत्पादन खर्च कमी करण्याची गरज ः...नांदेड ः ‘‘जगाच्या तुलनेत आपल्या देशात कपाशीची...
खानदेशातील तुरीच्या आवकेत ४० टक्के घटजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
कीटकनाशक फवारणीला अनुदान द्या : आंबा...मुंबई : कोकण किनारपट्टीच्या भागात १८ व १९...
पारनेर : महावितरणच्या विरोधात शेतकरी...निघोज, ता. पारनेर : विहिरीत पाणी असूनही पिकांना...
खानदेशात ऊसगाळप राहणार मार्चअखेरपर्यंत...जळगाव ः  खानदेशात सुमारे १६ लाख टन ऊस गाळप...
कोल्हापुरात आग्या मधमाशा जतन,...कोल्हापूर : आग्या मधमाशा जतन आणि संवर्धनासाठी...
शेतकऱ्यांना अडचणीत आणू नका ः डॉ. पवारनाशिक : ‘‘वीज महावितरणच्या मनमानी...
संभाव्य निर्बंध, लॉकडाउनमुळे द्राक्ष...नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात...
सिंधुदुर्गमध्ये होणार ड्रोनद्वारे होणार...सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या स्वामित्व योजनेतर्गत...
मराठीला अभिजात दर्जा मिळविणारच :...मुंबई : ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला,...
खामसवाडीत नुकसानग्रस्त पिकांची होणार...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : परिसरात १९ फेबुवारी...
किमान २५ टक्के शेतीमालावर प्रक्रिया...जालना : ‘‘उत्पादित केलेल्या किमान २५ टक्के...
नगर जिल्ह्यात पाच हजारांवर शेतकऱ्यांना...नगर ः जिल्ह्यातील २०१९ - २० चा खरीप व रब्बी हंगाम...
सोसायट्यांच्या वसुलीपूर्वी प्रोत्साहन...सातारा : आता मार्च महिन्यात सोसायट्यांची...
केळीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनएकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनामुळे पिकास...
सकाळी थंड, तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...